शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुरमीत राम रहीमला झेड प्लस सुरक्षा, खलिस्तान्यांकडून जीवाला धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 12:03 IST

Dera chief Gurmeet Ram Rahim : खलिस्तान समर्थक डेरा प्रमुख राम रहीमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात, त्यामुळे त्याला कडक सुरक्षा देण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

चंदीगड : पंजाब निवडणुकीपूर्वी संचित रजेवर (फर्लो) आलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला झेड प्लस ( Z+) सुरक्षा देण्यात आली आहे. हरयाणा सरकारने खलिस्तान्यांपासून गुरमीत राम रहीमच्या जीवाला धोका असल्याचे सांगत  सुरक्षा वाढवली आहे. सरकारने एडीजीपी (CID) यांचा अहवाल सुरक्षेचा आधार बनवला आहे. खलिस्तान समर्थक डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात, त्यामुळे त्याला कडक सुरक्षा देण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी गुरमीत राम रहीम 21 दिवसांच्या संचित रजेवर आहे. निवडणुकीपूर्वी मिळालेल्या संचित रजेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत हरयाणा सरकारला घेरले होते. दरम्यान, सिरसा मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदाचे पंजाब आणि उत्तर प्रदेश या निवडणूक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. मात्र, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, गुरमीत राम रहीमला फर्लो मंजूर करण्याचा कोणत्याही निवडणुकीशी काहीही संबंध नाही. बॉलीवूड अभिनेता माही गिल आणि पंजाबी अभिनेता हॉबी धालीवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या वर्षीही डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला त्याच्या आजारी आईला भेटण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपत्कालीन पॅरोल मंजूर करण्यात आला होता. प्रकृतीचे कारण सांगून तो काही वेळा तुरुंगातून बाहेरही आला होता. दरम्यान, गुरमीत राम रहीम हा रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची आणि 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. सध्या गुरमीत राम रहीमला काही अटींसह 21 दिवसांची संचित रजा देण्यात आली आहे. यामध्ये तो जाहीर सभा घेऊ शकत नाही किंवा त्याच्या सिरसा डेरामध्ये भाविकांची गर्दी करू शकत नाही. यासोबतच तो परवानगी घेऊनच शहराबाहेर जाऊ शकतो. 

दरम्यान, गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट 2017 रोजी साध्वी बलात्कार प्रकरणी पंचकुला कोर्टात हजर करण्यात आले होते. विशेष सीबीआय न्यायालयाने त्याची सुनारिया तुरुंगात रवानगी केली होती. या प्रकरणी 27 ऑगस्ट रोजी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात सीबीआय कोर्टाची सुनावणी झाली, ज्यामध्ये गुरमीत राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. लात्कार आणि हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमलाही दोषी ठरवण्यात आले होते. गुरमीत राम रहीम तेव्हापासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा