शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये पालिका उपायुक्तांनी केला पुतणीसोबत प्रेमविवाह, व्हिडीओ शेअर करत नवदाम्पत्य म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:01 IST

Deputy Commissioner Love Marriage: बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बेगुसराय नगरपालिकेच्या उपायुक्तांनी एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही घटना प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे.

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बेगुसराय नगरपालिकेच्या उपायुक्तांनी एका मुलीचे अपहरण केल्याचा आरोप झाला होता. मात्र प्रत्यक्षात ही घटना प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे. अपहरण प्रकरणीतील आरोपी शिव शक्ती कुमार यांनी नात्याने त्यांची पुतणी लागणाऱ्या सजल सिंधू नावाच्या तरुणीसोबत विवाह केल्याचे उघड झाले आहे. या दोघांनीही खगडिया येथील कात्यायानी मंदिरात जाऊन लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर नवदाम्पत्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमधून या दाम्पत्याने आपलं म्हणणं समोर मांडलं आहे.  आम्ही विवाह केला असून, अपहरणाबाबत दाखल करण्यात आलेली एफआयआर पूर्णपणे खोटी आहे, असं त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला सांगितलं आहे.

दरम्यान, सजल सिंधू हिने हा व्हिडीओ मानवाधिकार आयोग, बार कौन्सिल आणि सरन्यायाधीशांना मेल केला आहे. तर शिव शक्ती कुमार यांनी आपल्या जीवितास धोका अससल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्याला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र हे दोघेही अद्याप सर्वांसमोर आलेले नाहीत. शिव शक्ती कुमार हे त्यांच्या बेगुसरायमधील कार्यालयात पोहोचलेले नाहीत. तसेच ते घरीही गेलेले नाहीत.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य खगडिया येथे एका गुप्त ठिकाणी राहत आहे. शिव शक्ती कुमार यांनी व्हिडीओमध्ये सांगितले की, जर तुम्ही प्रेम करत असाल तर तुमचं प्रेमाप्रति समर्पण असलं पाहिजे.  आर्थिक मोह आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या आहारी जाता कामा नये. आम्ही प्रेमाप्रति समर्पण दाखवलं आहे.  

ते पुढे म्हणाले की, आमच्याविरोधात वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर सदर पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अपहरण किंवा इतर कुठलंही अनैतिक काम केलेलं नाही. आम्ही प्रेमविवाह केला आहे. आता आमच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रशासनाने सुरक्षा पुरवावी. नैतिकतेच्या नावाखाली लोकांच्या हिंसक होण्यामुळे आम्ही स्वत:ला असुरक्षित समजत आहोत, असेही त्यांनी सांगितले.   

टॅग्स :marriageलग्नFamilyपरिवारBiharबिहार