शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

COVID-19: कोरोनाबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता विदेशातून परतल्यावर होणार कोविड चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:46 IST

COVID-19 Cases In UP: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची रूग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर भारतात दक्षता घेतली जात आहे.

लखनौ : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने रौद्ररूप दाखवण्यास सुरूवात केली आहे. यामुळे उत्तर प्रदेश सरकारने आता ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला आहे. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने तपासापासून उपचारापर्यंतची व्यवस्था सुरू करावी, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच विमानतळावरील सोयी सुविधा वाढवाव्यात. संक्रमणग्रस्त देशांमध्ये प्रवास करून परतलेल्या लोकांची चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले पाहिजे, जेणेकरून व्हायरसचे प्रकार शोधता येतील अशा सूचना त्यांनी दिल्या. 

बुधवारी उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी राज्यातील सर्व सीएमओ आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. त्यांनी म्हटले की, कोरोना संसर्गग्रस्त देशातून येणाऱ्या प्रवाशांची चौकशी करण्यात यावी. जीनोम सिक्वेन्सिंग केले पाहिजे, जेणेकरून नवीन प्रकार लगेच शोधता येईल. सर्दी आणि तापासह इतर लक्षणे असलेल्या प्रवाशांची तपासणी करा. तसेच कोविड संशयिताचे नमुने घेऊन त्यांची चाचणी करावी. यासोबतच विदेशातून परतलेल्या लोकांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला द्या. यासाठी आरोग्य विभागाने विदेशातून परतलेल्या लोकांची यादी तयार करावी. 12 ते 14 दिवस त्यांच्या प्रकृतीची पाहणी करा. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास त्यांच्यावर उपचार करणे आवश्यक आहे, असे पाठक यांनी अधिक सांगितले. 

काळजी घेण्याचा दिला सल्ला उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले की, चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा धोका पुन्हा वाढला आहे. सावधगिरी बाळगून, आपण कोविडच्या धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता. गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाणे टाळा. शक्यतो मास्क घालूनच बाहेर पडा. याशिवाय जागरूकतेने कोरोनाचा पराभव केला जाऊ शकतो. मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा, यामुळे संसर्गाचा सहज सामना केला जाऊ शकतो, असा सल्लाही उपमुख्यमंत्र्यांनी दिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन