शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

सावळ्या रंगामुळे लोक टोमणे मारायचे; १७ वर्षीय तरुणाची १५व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 10:21 AM

लोकांच्या टोमण्यांमुळे १७ वर्षीय मुलगा तणावाखाली होता; लोकांच्या टोमण्यांमुळे त्यानं आत्महत्या करून जीवन संपवलं

नोएडा: सावळ्या रंगामुळे निराश असलेल्या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सावळ्या रंगामुळे त्रासलेल्या तरुणानं मॉडर्न सोसायटीच्या १५ व्या मजल्यावरून आत्महत्या करून जीवन संपवलं. सोसायटीतले मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना त्यांनी मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. संयम असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो १७ वर्षांचा होता. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी किंवा पत्र लिहिलेलं नाही.कर्नाटकच्या 'सेक्स फॉर जॉब' प्रकरणाला नवे वळण; जारकीहोळींविरोधातील तक्रार घेतली मागेनोएडातल्या सेक्टर ७८ मध्ये राहणारा संयम त्याच्या सावळ्या रंगामुळे सतत चिंतेत असायचा. काही दिवसांपूर्वीच त्याला कोणीतरी रंगावरून बोललं होतं. त्यामुळे तो तणावाखाली होता. या कारणामुळेच त्यानं आत्महत्या केली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. संयमच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.आईवडील शेतात गेलेले असताना १३ वर्षांच्या शाळकरी मुलीने गळफास घेत केली आत्महत्याघटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी सुधीर कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संयमचे वडील सेक्टर-१४२ मध्ये एका मोबाईल कंपनीत काम करतात. संयम त्याच्या कुटुंबासोबत महागुण मॉडर्न सोसायटीत राहायचा. अकरावीत शिकत असलेल्या संयमनं शनिवारी पहाटे ४.३० वाजता १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.पहाटे ५ वाजता सोसायटीतल्या काही व्यक्ती वॉकसाठी निघाल्या. तेव्हा त्यांनी एका मुलाचा मृतदेह पाहिला. त्यांनी याची माहिती सुरक्षा रक्षकाला दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलाची ओळख पटल्यानंतर याची माहिती त्याच्या कुटुंबाला देण्यात आली. संयमला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.संयम अतिशय हुशार विद्यार्थी होता. मात्र कोणीतरी सावळ्या रंगावरून त्याची खिल्ली उडवल्यानं गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळीदेखील तो अतिशय तणावाखाली होता. मात्र कुटुंबानं त्याची समजूत काढली. मात्र गेल्या काही दिवसांपासून संयम पुन्हा तणावाखाली गेला. त्याचं कुटुंब त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होतं.