शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी सुखावले : महिन्यातून दोन शनिवारी दप्तराला सुटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 07:08 IST

विद्यार्थी सुखावले : जगनमोहन सरकारचा निर्णय; विद्यार्थी मोकळ्या वातावरणात घेणार शिक्षण

विजयवाडा : आंध्र प्रदेशातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आता दर महिन्याच्या पहिल्या व तिसºया शनिवारी दप्तराचे ओझे असणार नाही. विद्यार्थ्यांना मोकळ्या वातावरणात शिक्षण घेता येण्यासाठी आंध्र प्रदेशमधील जगनमोहन सरकारने घेतलेला हा निर्णय राज्यातील सर्व खासगी व सरकारी शाळांसाठी बंधनकारक आहे.

या निर्णयाचे पालक, विविध शाळा, शिक्षक तसेच शिक्षणक्षेत्रातील अनेक संघटनांनी स्वागत केले आहे. विनादप्तर दिनाची संकल्पना पालक, विद्यार्थ्यांना नीट समजावून सांगावी असा आदेश राज्य सरकारने सर्व शाळांना दिला आहे. विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. या रगाड्यात ते खेळण्याचेही अनेकदा विसरून जातात. पाठीवरील वजनदार दप्तरामुळे अनेक मुलांना पाठीचे, मानेचे आजारही जडतात. या गोष्टींपासून वाचण्यासाठी मुलांना विनादप्तर दिन अत्यंत उपयोगी ठरणार असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. कृष्णा जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी एम. व्ही. राज्यलक्ष्मी यांनी सांगितले की, विनादप्तर दिनामुळे विद्यार्थ्यांना अधिक मोकळेपणाने शिक्षण घेता येईल. माध्यमिक स्तरालाही लागू कराच्केवळ प्राथमिक स्तरावरीलच नव्हे तर माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठीही विनादप्तर दिनाचा निर्णय लागू करावा अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय)चे राज्य सहसचिव एस. नरसिंहम यांनी केली आहे.च्विनादप्तर दिन निर्णयाची खासगी शाळांतून नीट अंमलबजावणी होत आहे का याकडेही सरकारने बारीक लक्ष ठेवावे असे दुसºया इयत्तेत शिकणाºया एका मुलाचे वडील बाथिना रघुराम यांनीसांगितले.च्मुलांच्या दप्तराचे वजन कमी करण्याची गरज आहे असे पत्र कृष्णा जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष बी. व्ही. एस. कुमार यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना लिहिले होते.च्माझ्या दप्तरात किमान वीस वह्या-पुस्तके असतात. ते ओझे घेऊन शाळेत येताना व घरी परत जाताना माझी दमछाक होते. आता महिन्यातून दोन दिवस तरी त्यातून आमची सुटका होईल.च्आपल्या सूचनेनुसार निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. पी. सृजना या पाचवी इयत्तेतील विद्यार्थीनीने सांगितले की, विनादप्तर दिनाच्या दिवशी पाठीवर कोणतेही ओझे न घेता मला शाळेत यायला मिळणार आहे.

टॅग्स :SchoolशाळाAndhra Pradeshआंध्र प्रदेशStudentविद्यार्थी