शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! लग्नात आनंदाने नाचत होते काका पण अचानक...; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू'    

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 10:04 IST

दारातच काही तरुण आणि इतर वरातीतील लोक ऑर्केस्ट्रामध्ये नाचत होते. यादरम्यान  पिकअप गाडीवर चढले आणि डान्सरसोबत डान्स करू लागले. 

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्धाचा वरातीत डान्सरसोबत नाचतानाचा आणि स्टंट करताना खाली पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नाचणाऱ्या व्यक्तीचा खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. मृताचा भाऊ प्रमोद गिरी यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि घटनेला दुजोरा दिला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरिया जिल्ह्यातील भटनी येथील चंदौली गावातून 11 जून रोजी  मानसिंग यांच्या मुलाची वरात भाटपारराणीच्या बंगरा बाजार येथे गेली होती. येथे एकीकडे द्वारपूजा चालू होती तर दुसरीकडे काही लोक नाश्ता करण्यात मग्न होते, तर दारातच काही तरुण आणि इतर वरातीतील लोक ऑर्केस्ट्रामध्ये नाचत होते. यादरम्यान  पिकअप गाडीवर चढले आणि डान्सरसोबत डान्स करू लागले. 

राम निवास गिरी हे नाचता नाचता गाडीच्या छताला असलेल्या लोखंडी रॉडला लटकून स्टंट करू लागले. त्यानंतर अचानक त्यांचा हात सुटला आणि ते जमिनीवर कोसळले. मंडपात एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर राम निवास गिरी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. 

मृत राम निवास गिरी हे अविवाहित होते आणि आपल्या लहान भावाच्या कुटुंबासह गावात राहात होते. या प्रकरणी भटनीचे अधिकारी संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचताना पडल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, मात्र कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यात ही संपूर्ण घटना दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूmarriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश