चीनकडून घुसखोरी झाल्याचा इन्कार
By Admin | Updated: August 20, 2014 01:06 IST2014-08-20T01:06:53+5:302014-08-20T01:06:53+5:30
लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

चीनकडून घुसखोरी झाल्याचा इन्कार
नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांना चीनचे लष्कर भारतात शिरल्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. यावेळी त्यांना, चीनचे सैन्य भारतात शिरले आहे काय असा प्रश्न विचारला असता त्यांनी, नाही, असे काही घडले नाही, असे म्हटले.
प्रसिद्धीमाध्यमांनी मंगळवारी उत्तर लडाखकडून चीनचे सैनिक भारतीय हद्दीत 25 ते 3क् कि.मी. अंतरार्पयत आत शिरल्याच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या. या सैनिकांनी आपले तंबू व ङोंडेही तिथे रोवले असल्याचे या वृत्तात म्हटले होते. या ङोंडय़ांवर, हा भाग चीनचा आहे, परत जा असे लिहिले असल्याचे या वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले होते. या वृत्तानुसार चीनच्या सैनिकांनी परत जाण्याच्या एक दिवस आधी या ठिकाणी मुक्काम केला होता. हा प्रदेश समुद्रसपाटीपासून 17 हजार फूट उंचीवर आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी या प्रकरणी सरकारवर टीका करताना स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून पाकिस्तान व चीनला कठोर संदेश दिला गेला असता तर पाक भारतीय प्रकरणांत हस्तक्षेप करू शकला नसता व चीन भारतीय सीमेवर घुसखोरीही करू शकला नसता असे वक्तव्य केले.
4काँग्रेसचे एक अन्य नेते मनीष तिवारी यांनीही चिनी लष्कर भारताच्या हद्दीत 25कि.मी. र्पयत आत शिरते आणि भारताचे सरकार मौन बाळगून असते यावर आक्षेप घेतला आहे.