दिल्लीत हिंदू संतांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 08:44 IST2023-09-26T08:44:29+5:302023-09-26T08:44:53+5:30

‘तामिळनाडू भवन’जवळ निदर्शने करून त्यांचा पुतळा जाळला.

Demonstrations of Hindu saints in Delhi | दिल्लीत हिंदू संतांची निदर्शने

दिल्लीत हिंदू संतांची निदर्शने

नवी दिल्ली : सनातन धर्मावरून देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेकडो साधू-संतांनी द्रविड मुन्नेत्र कळघमचे (डीएमके) नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात येथील ‘तामिळनाडू भवन’जवळ निदर्शने करून त्यांचा पुतळा जाळला.

आंदोलकांनी सनातन धर्माबाबत अशीच विधाने करणाऱ्या आणि द्रमुक नेत्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या अन्य नेत्यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. या आंदोलनात सहभागी साधू-संतांनी विविध फलक हातात घेतले होते.

Web Title: Demonstrations of Hindu saints in Delhi