मतमोजणीचे प्रात्यक्षिक आणि आढावा

By Admin | Updated: May 9, 2014 21:13 IST2014-05-09T21:13:29+5:302014-05-09T21:13:29+5:30

कोल्हापूर : लोकसभेच्या हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघाची शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सर्व कर्मचार्‍यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच सायंकाळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मतमोजणी तयारीचा आढावा घेतला.

Demonstration and Review of Countdown | मतमोजणीचे प्रात्यक्षिक आणि आढावा

मतमोजणीचे प्रात्यक्षिक आणि आढावा

ल्हापूर : लोकसभेच्या हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघाची शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सर्व कर्मचार्‍यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच सायंकाळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मतमोजणी तयारीचा आढावा घेतला.
सकाळी शाहू स्मारक भवन येथे मतमोजणी प्रक्रियेत भाग घेणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी माने, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, पुरवठा अधिकारी संजय श्िंादे, निवडणूक अधिकारी संगीता चौगुले यांच्यासह साहाय्यक निवडणूक अधिकारी उपस्थित होते. यावेळी इव्हीएम मशीन खोलण्यापासून कशा प्रकारे मतमोजणी करायची याची माहिती देण्यात आली.
दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी आढावा बैठक झाली. या बैठकीस सर्व अधिकार्‍यांसह अप्पर पोलीस अधीक्षक अंकीत गोयल उपस्थित होते. यावेळी स्ट्राँग रूमची सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी केंद्राबाहेरची बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला. मतमोजणी केंद्रात मीडिया सेंटरची स्थापना करण्यावरही या बैठकीत चर्चा झाली.
-------------
मोबाईल नेण्यावर बंधने
मतमोजणी केंद्रात पत्रकारांसह कोणाही व्यक्तीला मोबाईल नेता येणार नाही. मोबाईल आत येणार नाहीत यादृष्टीने कसून तपासणी करावी, अशा सूचना पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आल्या. मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण १५ मे रोजी होणार आहे.

Web Title: Demonstration and Review of Countdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.