शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

या देशाचा कोणीही बिग बॉस नाही, लोकशाहीच इथली बिग बॉस- ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 11:43 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ममतांची मोदींवर टीका

कोलकाता: सीबीआय विरुद्ध कोलकाता पोलीस या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. कोलकात्याचे पोलीस आयुक्त चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचा दावा न्यायालयात सीबीआयनं केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आयुक्तांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. हा निर्णय म्हणजे बंगाली जनतेचा, देशातील नागरिकांचा विजय असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. या देशाचा कोणीही बिग बॉस नाही, लोकशाहीच देशाची बिग बॉस आहे, असं म्हणत ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नमूद केलेले मुद्दे हा आमच्यासाठी नैतिक विजय आहे. केंद्र सरकारकडून घटनेचं उल्लंघन सुरू आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करू. कोणीही या देशाचं बिग बॉस होऊ शकत नाही. केवळ लोकशाहीच इथली बिग बॉस आहे,' असं ममता म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयात आज जे काही झालं, तो देशाचा, घटनेचा, तरुणांचा विजय आहे, असंही त्या पुढे म्हणाल्या. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी कधीही सीबीआयशी सहकार्य करण्यास नकार दिला नाही, असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. आपण चौकशीसाठी उपलब्ध असू, असं कुमार यांनी सीबीआयला कळवलं होतं. मात्र सीबीआयला त्यांना थेट अटक करायची होती. रविवारी सीबीआयचे अधिकारी कोणत्याही वॉरंटशिवाय त्यांच्या घरी गेले. सीबीआयला त्यांना अटक करायची होती. मात्र न्यायालयानं कुमार यांच्या अटकेची गरज नसल्याचं सांगितलं. न्यायालयाचा हा आदेश स्वागतार्ह आहे. यामुळे अधिकारी वर्गाचं मनोबल नक्कीच उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगाल