निधन वार्ता-२
By Admin | Updated: May 12, 2014 20:56 IST2014-05-12T20:56:42+5:302014-05-12T20:56:42+5:30
कृष्णात काटकर

निधन वार्ता-२
क ष्णात काटकरकोल्हापूर : टेंबलाईवाडी अष्टविनायक कॉलनी येथील कृष्णात ईश्वरा काटकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. १५) रोजी सकाळी ९:०० वाजता होणार आहे. ---------फोटो : १२ कृष्णात काटकर (निधन)------------------------इंदुमती हिवाळेकोल्हापूर : अंबाई डिफेन्स कॉलनी येथील लेफ्टनंट कर्नल इंदुमती शंकरराव हिवाळे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांनी १९४३ च्या दुसर्या महायुद्धात आर्मी ऑक्झीलरी नर्सिंगमध्ये काम केले आहे. तर त्याचबरोबर युद्धानंतर इराक येथे जखमींची सेवाही केली आहे. लंडनमध्ये झालेल्या विजयी संचलनातही सहभाग घेऊन पाचवा किंग्ज जॉर्ज यांच्याबरोबर भोजनासाठी आमंत्रित झालेल्या त्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला होत्या. दुसर्या महायुद्धानंतर भारतास १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. मात्र, यामध्ये भारत पाकिस्तान अशी फाळणी झाली. यामध्ये जखमी झालेल्या निर्वासितांवर कुरुक्षेत्र येथे सेवाही केली. याबद्दल त्यांना भारतीय सैन्य दलाने लेफ्टनंट (परिचारिका सेवा) पदवी देऊन गौरविले. १९६२ साली युनोतर्फे कांगो येथे पाठविण्यात आलेल्या शांतीसेनेतही त्यांनी काम केले. १९६५ दरम्यान भारत-पाकिस्तान युद्धात जखमी झालेल्या भारतीय सैन्यांची सेवा केली. यावेळी त्यांनी १५ तासांपेक्षा अधिक काम केले. या कामगिरीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना विशिष्ट सेवा मेडल देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे परिचारिका दिनीच त्यांचे निधन झाले. फुले वाहण्याचा कार्यक्रम बुधवार (दि. १४) रोजी होणार आहे. ----------फोटो : १२ इंदुमती हिवाळे (निधन)