शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
5
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
6
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
7
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
8
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
9
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
10
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
11
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
13
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
14
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
15
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
16
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
17
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
18
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
19
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 05:41 IST

भारताची जवळजवळ अर्धी लोकसंख्या ऑनलाइन गेम खेळण्यात गुंतलेली आहे. त्यामुळे समाज, अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सोशल मीडिया आणि ई-स्पोर्ट्स गेम्सच्या नावाखाली काम करणाऱ्या ऑनलाइन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी ‘सेंटर फॉर अकाउंटेबिलिटी अँड सिस्टिमिक चेंज’ (सीएएससी) द्वारे दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने  सहमती दर्शवली.

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने गुरुवारी सीएएससीचे वकील विराग गुप्ता यांचे युक्तिवाद ऐकले आणि १७ ऑक्टोबर रोजी जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.

या याचिकेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, माहिती आणि प्रसारण, वित्त, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांना ऑनलाइन गेमिंग प्रमोशन आणि रेग्युलेशन कायदा, २०२५ च्या तरतुदी आणि राज्य विधिमंडळांनी लागू केलेल्या कायद्यांचा सुसंगत अर्थ लावण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

१३ ऑक्टोबर रोजी वकील विराग गुप्ता आणि रूपाली पनवार यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत चार केंद्रीय मंत्रालये, दोन प्रमुख ॲप स्टोअर ऑपरेटर - ॲपल इंक आणि गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह सहा प्रतिवादींची नावे आहेत. देशभरात व्यापक सामाजिक आणि आर्थिक नुकसान होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

ऑनलाइन गेम खेळण्यात गुंतली अर्धी लोकसंख्या...जनहित याचिकेत म्हटले आहे की, भारताची जवळजवळ अर्धी लोकसंख्या ऑनलाइन गेम खेळण्यात गुंतलेली आहे. त्यामुळे समाज, अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अलीकडेच पारित झालेल्या ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन ॲक्ट, २०२५ च्या उद्दिष्टांमध्ये ऑनलाइन बेटिंग व जुगाराचे परिणाम समाविष्ट आहेत. संसदेत माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या भाषणानुसार, हे विधेयक समाजात पसरणाऱ्या या गंभीर प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सादर करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलांचा डेटा संरक्षित करण्याची विनंतीयाचिकेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  व यूपीआय प्लॅटफॉर्मना विनंती केली की, त्यांनी नोंदणी नसलेल्या गेमिंग ॲप्सशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारांना रोखण्यासाठी निर्देश द्यावेत. जनहित याचिकेत ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी पूर्वी गोळा केलेल्या अल्पवयीन मुलांचा डेटा संरक्षित करण्यासाठी सूचना द्यावी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Plea to ban online gambling nationwide; Supreme Court hears case.

Web Summary : The Supreme Court will hear a plea seeking a ban on online gambling platforms. The petition urges regulation and consistent interpretation of gaming laws. It highlights concerns about societal and economic impacts, especially involving minors, and seeks data protection measures. Financial transaction restrictions are also requested.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय