रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी

By Admin | Updated: May 12, 2014 17:04 IST2014-05-12T17:04:57+5:302014-05-12T17:04:57+5:30

पांगिरे : भुदरगड तालुक्यातील पांगिरे ते आळवेवाडी दरम्यानचा रस्ता खडीकरणासह डांबरीकरण करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ व प्रवाशी वर्गातून होत आहे.

Demand for road storages | रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी

रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी

ंगिरे : भुदरगड तालुक्यातील पांगिरे ते आळवेवाडी दरम्यानचा रस्ता खडीकरणासह डांबरीकरण करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ व प्रवाशी वर्गातून होत आहे.
पांगिरे ते नागणवाडी या मार्गावर पांगिरे ते आळवेवाडी हा एक कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्याची अक्षरश: चाळन बनलेली आहे. काही ठिकाणी डांबरी रस्त्याचे अस्तित्त्वच नष्ट झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस धोकादायक बनला आहे. गेले तीन ते चार वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था होऊनदेखील कोणाचेही लक्ष लागले नाही.
तालुक्यातील लोकप्रतिनिधीकडून २३ कोटी विकासकामांचे फलक लावले आहेत. मात्र अद्याप त्यांच्या विकास यादीतून हा रस्ता झालेला नाही तरी येथील लोकप्रतिनिधीनी आतातरी लक्ष देऊन या रस्त्याचे पावसापूर्वी खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थ व प्रवाशी वर्गातून होत आहे.
वार्ताहर

Web Title: Demand for road storages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.