निमाणी ते राणेनगर बसची मागणी
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:11+5:302015-02-14T23:52:11+5:30
नागरिकांची गैरसोय : दिवसभरात एकच फेरी

निमाणी ते राणेनगर बसची मागणी
न गरिकांची गैरसोय : दिवसभरात एकच फेरीइंदिरानगर : गजानन महाराज मंदिरमार्गे निमाणी ते राणेनगर बससेवा सुरू करण्याची मागणी अद्यापही धूळ खात पडून आहे. यामुळे गजानन महाराज मार्गावरून दिवसभरात एकच बसफेरी होत असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. इंदिरानगरातील सर्वात जुना आणि महत्त्वाचा रस्ता म्हणून गजानन महाराज मार्ग ओळखला जातो. १९९० साली इंदिरानगर परिसरात ये-जा करण्यासाठी गजानन महाराज मार्गे विजयनगर अशा दिवसभरात १२ ते १५ बसच्या फेर्या होतात. यामध्ये सकाळ दुपार आणि सायंकाळी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस तसेच कार्यालय वेळेनुसार बसेस धावत असत. परिसरात नागरिक वसाहत झपाट्याने वाढत गेली. त्यानुसार बसच्या फेर्या वाढणे अपेक्षित होते. परंतु शहर बस वाहतुकीच्या अजब कारभारामुळे वाढत्या लोकवस्तीनुसार बसफेर्या वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. सध्या दिवसभरात एकच बसफेरी या मार्गावरून होत आहे. गेल्या २५ वर्षांत या परिसरात कॉलनी, सोसायटी आणि अपार्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे विद्यार्थी वर्ग शहरात शिक्षण घेण्यासाठी दररोज ये-जा करतात. परंतु बसफेर्यांची संख्या अपुरी असल्याने जॉगिंग ट्रॅकच्या बोगद्यातून पायी ये-जा करीत व जादा पैसे मोजून रिक्षाने प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तातडीने गजानन महाराज रस्त्याच्या मार्गे निमाणीने राणेनगर बससेवा सुरू करावी, अशी मागणी मुकेश हजारे, योगेश कुलकर्णी, महेश कोथमिरे, किरण पिसोळकर, अनिल जाचक व नागरिकांनी केली आहे. (वर्ताहर)इन्फो====बससेवा सुरू झाल्यास राजीवनगर, कानिफनाथनगर, रामनगरसह परिसरातील नागरिकांची सोय होईल.