पुलाचे काम सुरू करण्याची मागणी
By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:42+5:302014-05-10T19:41:42+5:30
जामठी बु. - जामठी बु. ते जामठी फाटा या मार्गावरील खरकाडी नाल्यावरील पुलाचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. जामठी बु. ते जामठी फाटा हा मार्ग उत्तरेकडील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा व दक्षिणेकडील अमरावती-कारंजा राज्य महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असते. या मार्गावर खरकाडी नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात बरेचदा या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे कित्येक तास वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी व ड्रेन स्लॅबचे काम करावे, अशी मागणी ग्रामपंचायतकडून करण्यात आली होती. दरम्यान, एक महिन्यापूर्वी या पुलाचे काम सुरू झाले, परंतु तो स्लॅब ड्रेन प्रकारचा नसल्यामुळे काही ग्रामस्थांनी त्याला विरोध करून ते काम बंद पाडले. आता पुलाचे बांधकाम अर्धवट झाले अस

पुलाचे काम सुरू करण्याची मागणी
ज मठी बु. - जामठी बु. ते जामठी फाटा या मार्गावरील खरकाडी नाल्यावरील पुलाचे रखडलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. जामठी बु. ते जामठी फाटा हा मार्ग उत्तरेकडील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा व दक्षिणेकडील अमरावती-कारंजा राज्य महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असते. या मार्गावर खरकाडी नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात बरेचदा या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे कित्येक तास वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी व ड्रेन स्लॅबचे काम करावे, अशी मागणी ग्रामपंचायतकडून करण्यात आली होती. दरम्यान, एक महिन्यापूर्वी या पुलाचे काम सुरू झाले, परंतु तो स्लॅब ड्रेन प्रकारचा नसल्यामुळे काही ग्रामस्थांनी त्याला विरोध करून ते काम बंद पाडले. आता पुलाचे बांधकाम अर्धवट झाले असून, वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा वळण मार्ग काढण्यात आला आहे. आता पावसाळा जवळ आला असून, जोराचा पाऊस आल्यास या वळणमार्गावरून वाहने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या पुलाचे बांधकाम ड्रेन स्लॅब पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)