ेेत्र्यंबकेश्वरच्या जुना जव्हार फाटा त्रिफुलीवर गतिरोधकाची मागणी
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:34+5:302016-04-26T00:16:34+5:30
त्र्यंबकेश्वर- येथील जुना जव्हार फाट्यावर गतीरोधक बसवावेत, अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकीची उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी केली आहे. सिंहस्थ काळापूर्वी खास सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर चौपदरी रस्ता थेट सापगाव पर्यंत तयार करण्यात आला. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला.

ेेत्र्यंबकेश्वरच्या जुना जव्हार फाटा त्रिफुलीवर गतिरोधकाची मागणी
त र्यंबकेश्वर- येथील जुना जव्हार फाट्यावर गतीरोधक बसवावेत, अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकीची उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी केली आहे. सिंहस्थ काळापूर्वी खास सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर चौपदरी रस्ता थेट सापगाव पर्यंत तयार करण्यात आला. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला.शनिवारी दुपारच्या सुमारासस त्र्यंबकेश्वर शहरातून नाशिककडे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार येत असतांना जव्हारकडून नाशिककडे जाणार्या पिकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर बसलेल्जा तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्या ठिकाणी गतीरोधक असता तर कदाचित अपघात टळला असता. भविष्यात असे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव दोन्हीही जव्हार फाट्यावर गतीरोधक बसविण्याची मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन गतीरोधक बसविण्याची मागणी कदम यांनी केली आहे. दिवसेंदिवस त्र्यंबकला येणार्या भाविकांची संख्या वाढत असल्याने गतीरोधक बसविणे गरजेचे आहे. गतिरोधकांची उंची कमी असावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)----