अल्पभूधारक शेतकर्यांना अंत्योदय योजनेचा लाभ द्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाची मागणी
By Admin | Updated: December 23, 2014 00:51 IST2014-12-22T23:11:48+5:302014-12-23T00:51:45+5:30
लातूर : मराठवाड्यासह लातूर जिल्ात दुष्काळ आहे़ नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून जिल्ात दुष्काळ आहे़ त्यामुळे आल्पभूधारक शेतकर्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंंदोलन न्यासाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात सोमवारी करण्यात आले़

अल्पभूधारक शेतकर्यांना अंत्योदय योजनेचा लाभ द्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाची मागणी
लातूर : मराठवाड्यासह लातूर जिल्ात दुष्काळ आहे़ नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत़ गेल्या तीन वर्षांपासून जिल्ात दुष्काळ आहे़ त्यामुळे आल्पभूधारक शेतकर्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंंदोलन न्यासाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात सोमवारी करण्यात आले़
५ एकरच्या आत शेती असणार्या शेतकर्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतावरच चालतो, अशा शेतकर्यांना प्रतिकार्ड ३५ किलो धान्य व प्रतिमाणसी ६०० ग्रॅम साखर अल्पदरामध्ये देऊन त्यांना अंत्योदय योजनेत सहभागी करुन घ्यावे़ त्यानुसार राज्य शासनाने १७ जुलै २०१३ रोजी निर्णय काढलेला आहे़ ही योजना राबविल्यानंतर बळीराजाला मदत होईल़ या योजनेमुळे छोट्या शेतकर्यांची उपासमार होणार नाही, असेही या निवेदनात जिल्हा दक्षता समितीचे सदस्य ॲड़महेश ढवळे यांनी म्हटले आहे़