शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Fuel Price: दिलासादायक...पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त करणार; जेटलींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 3:26 PM

देशातील जनता वाढत्या इंधन दरांमुळे महागाईच्या झळा सोसत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे.

नवी दिल्ली : देशातील जनता वाढत्या इंधन दरांमुळे महागाईच्या झळा सोसत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे. या पार्श्वभुमीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर 2.5 रुपयांनी कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. 

जेटली यांनी काल तेल उत्पादन कंपन्यांसोबत बैठक घेतली. यावेळी आढावा घेण्यात आला. जेटली यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्याने त्याची झळ देशाला बसली. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने देशातील इंधनाचे दर वाढले. कंपन्यांसोबत चर्चा करताना अबकारी कर खात्यासह इतर सर्व खात्यांशी चर्चा केली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतही चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रस्तावावर संमती दिली आहे. 

केंद्र सरकार अबकारी करात 1.5 रुपये कपात करणार असून पेट्रोल उत्पादन कंपन्या 1 रुपया असे मिळून 2.5 रुपये पेट्रोल डिझेलची किंमत कमी करण्यात येत आहे, असे सांगत त्यांनी राज्य सरकारांच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. राज्य सरकारांकडे व्हॅटमुळे उत्पन्न वाढ होत आहे. तेलाची किंमत वाढली की व्हॅटनुसार त्यांचे उत्पन्नही वाढते. यामुळे राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 5 रुपयांनी कपात करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. 

काही राज्यांमध्ये तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि काही महिन्यांवर असलेल्या लोकसभा निवडणुकीला महागाईची झळ बसणार आहे. यामुळे केंद्रातील भाजप सरकार निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांना आयतेच कोलीत मिळू नये म्हणून इंधनाचे दर कमी करण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढArun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोल