उत्तर प्रदेशात मुद्दाम दंगली भडकावल्या जातात - राहुल गांधी
By Admin | Updated: August 9, 2014 11:11 IST2014-08-09T09:46:23+5:302014-08-09T11:11:06+5:30
लोकांना एकमेकांशी लढवून त्यांच्यातील एकी संपवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणूनबुजून दंगली भडवल्या जातात, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात मुद्दाम दंगली भडकावल्या जातात - राहुल गांधी
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - लोकांना एकमेकांशी लढवून त्यांच्यातील एकी संपवण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जाणूनबुजून दंगली घडवल्या जात आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे विधान केले. 'लोकांना एकमेकांशी लढायला लावायचे, त्यांच्यातील एकी संपवायची, फूट पाडायची म्हणजे मग ते गरीबी आणि असमानतेशी लढूच शकणार नाहीत', या उद्देशानेच राज्यात हिंसा पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बइघडला आहे. राज्यांत अनेक दंगली उफाळल्या आहेत, तसेच स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी बोलत होते. निवडणुकीनंतर राज्यात आत्तापर्यंत सांप्रदायिक हिंसेचे ६०५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.