शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; स्वित्झर्लंडहून मैत्रिणीला बोलावल अन् दिल्लीत संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 18:37 IST

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील टिळक नगर भागात परदेशी मुलीच्या हत्येची खळबळजनक घटना घडली. शुक्रवारी शाळेबाहेर एका महिलेचा मृतदेह सापडला आणि खळबळ माजली. कारमध्ये महिलेचा मृतदेह साखळीने बांधलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना संशय असलेला आरोपी गुरप्रीत सिंग याला अटक करण्यात आली आहे. लीना बर्गर असे मृत महिलेचे नाव असून ती स्वित्झर्लंडची रहिवासी आहे. दिल्लीत परदेशी नागरिकाची हत्या झाल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत आणि लीना बर्जर यांची स्वित्झर्लंडमध्ये भेट झाली त्यानंतर त्यांची मैत्री झाली. 

'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत सिंग हा मृत महिलेला भेटण्यासाठी अनेकदा स्वित्झर्लंडला जायचा. गुरप्रीत सिंगला लीनाचे दुसर्‍या पुरुषासोबत अफेअर असल्याचा संशय होता, त्यानंतर त्याने लीनाला भेटण्यासाठी ११ ऑक्टोबर रोजी भारतात बोलावले आणि नंतर तिची हत्या करण्याचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी आरोपी गुरप्रीतने महिलेला काही बहाण्याने एका खोलीत नेले आणि नंतर त्याची परदेशी मैत्रीण लीनाचे हात पाय साखळीने बांधून तिची हत्या केली. खरं तर मृतदेहावर छेडछाडीच्या खुणा देखील दिसत होत्या, तेही अर्धवट प्लास्टिकच्या पिशवीत भरलेल्या अवस्थेत होते. महिलेची इतरत्र हत्या करून पांढऱ्या सँट्रो कारमधून घटनास्थळी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पगडीधारी व्यक्तीसह दोन संशयित दिसत होते. मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकलातसेच गुरप्रीत सिंगने एका महिलेच्या आयडीवर जुनी कार खरेदी केली आणि नंतर विदेशी महिलेचा मृतदेह कारमध्ये टाकून ती पार्क केली. मात्र, लीनाच्या मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यावर आरोपी गुरप्रीतने त्याच जुन्या कारचा वापर करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आता गुरुप्रीतला अटक केली असून त्याच्या घरातून २.२५ कोटी रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून दोन वाहने देखील जप्त केली आहेत. एक कार ज्यामध्ये मृतदेह फेकण्यात आला आणि दुसरी नॅनो कार, ही देखील गुरप्रीत सिंगची असल्याचे उघड झाले आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीSwitzerlandस्वित्झर्लंडCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूArrestअटक