भूकंपामुळे दिल्लीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By Admin | Updated: February 8, 2017 09:44 IST2017-02-08T08:54:59+5:302017-02-08T09:44:27+5:30

सोमवारी रात्री राजधानी नवी दिल्लीत आलेल्या भूकंपाने शकरपूर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

Delhi's sex racket exposed in the earthquake | भूकंपामुळे दिल्लीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

भूकंपामुळे दिल्लीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 8 - सोमवारी रात्री राजधानी नवी दिल्लीत आलेल्या भूकंपाने शकरपूर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. भूकंपाचे हादरे बसू लागल्यामुळे काही जणांनी येथील एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील बालकनीमधून दोन तरुणींना उडी मारुन पळताना पाहिले. भूकंपामुळे सर्वांचीच जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू होती, त्यामुळे या दोघींनी देखील त्याचसाठी उडी मारुन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असावा, असे स्थानिकांनी वाटले. 
 
मात्र काही वेळानंतर याच फ्लॅटमधून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. नेमका काय प्रकार सुरू आहे हे पाहण्यासाठी स्थानिकांनी तेथे जाऊन पाहिले तर एक व्यक्ती त्या महिलेला खूप वाईट पद्धतीने मारहाण करत होता.  यावेळी ती महिला त्याच्या या छळातून सुटका करण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचा छळ काही थांबला नाही. यानंतर स्थानिकांनी पोलिसांनी संपर्क करुन बोलावून घेतले. 
 
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून या फ्लॅटमध्ये शरीरविक्रीचा व्यापार सुरू होता. मात्र, पोलिसांनी हे वृत्त नाकारले आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिला मारहाण करणा-याला ताब्यात घेतले. यावेळी स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली की, हे दोघंही पती-पत्नी असल्याची बतावणी करतात. मात्र या दोघांनी मिळून आणखी काही मुलींनाही फ्लॅटमध्ये ठेवले होते. दोघं मिळून शरीरविक्रीचा व्यवसाय करत होते. अंधार पडताच याठिकाणी लोकांची  मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू व्हायची. 
 
दरम्यान, डीसीपी ओमबीर सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरुन शरीरविक्री व्यवसाय होत असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. तसंच या फ्लॅटमधून दोन जणींनी उडी मारुन पलायन केले, ही बाब देखील पोलिसांनी नाकारली आहे. मात्र, पीडित महिलेने पतीविरोधात मारहाणीची तक्रार नोंदवली, त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. 
 

Web Title: Delhi's sex racket exposed in the earthquake