नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून आता राजकारण तापू लागले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दंगलीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर घणाघाती टीका केली. दरम्यान, सोनिया गांधी यांनी दिल्लीत उदभवलेल्या परिस्थितीबाबत केंद्र आणि राज्य सरकारवर पाच सवाल डागले आहेत. सोनिया गांधी यांनी केंद्र आणि दिल्ली सरकारला विचारलेले प्रश्न१ - गेल्या रविवारी हिंसाचाराला तोंड फुटले तेव्हा देशाचे गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते?२ - गेल्या रविवारी हिंसाचाराला तोंड फुटले तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते आणि ते काय करत होते ?३ - दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर गुप्तचर संस्थांकडून काय माहिती दिली गेली होती ४ - रविवारी रात्री हिंसाचार सुरू झालेल्या भागात किती प्रमाणात पोलिसांची तैनाती झाली होती. दंगे पसरणार हे माहिती असताना ते रोखण्यासाठी त्याबाबत काय हालचाही झाल्या ५ - दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांचे कुठलेही नियंत्रण राहिले नसताना अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती का करण्यात आली नाही?
Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:20 IST
Delhi Violence News: दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत दंगलीसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर घणाघाती टीका केली.
Delhi Violence: केंद्र आणि दिल्ली सरकारवर सोनिया गांधींचा घणाघात, विचारले पाच प्रश्न
ठळक मुद्देगेल्या रविवारी हिंसाचाराला तोंड फुटले तेव्हा देशाचे गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते?गेल्या रविवारी हिंसाचाराला तोंड फुटले तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते आणि ते काय करत होते ?दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांचे कुठलेही नियंत्रण राहिले नसताना अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती का करण्यात आली नाही?