शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील दंगलीवरून संसदेत रणकंदन, भाजपा-काँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:22 IST

Parliament Budget Session News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दिल्लीतील हिंसाचाराचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला.

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये दिल्ली दंगलीचा प्रश्न उपस्थित करून विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली. त्यातच लोकसभेमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या खासदरांमध्ये धक्काबुक्की झाली. गोंधळाच्या या वातावरणात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज उद्या सकळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत चालला होता. त्यानंतर आता  दुसरा टप्पा 2 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत चालणार आहे. दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी दिल्लीतील हिंसाचाराचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला.

विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली. दरम्यान, ज्यांच्या कार्यकाळात १९८४ सारखी घटना घडली ते आज इथे गोंधळ घालत आहेत, मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो, असा टोला संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला लगावला.

लोकसभेमध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. काँग्रेसच्या खासदारांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करत लोकसभेमध्ये बॅनर फडकावले. तसेच ट्रेजरी बेंचपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपा खासदार रमेश बिधुडी आणि काही अन्य खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात धक्काबुक्की झाली. 

संबंधित बातम्या

Delhi Violence: ट्रम्प येतील तेव्हा रस्त्यावर उतरा, उमर खालिदच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

दिल्लीतील हिंसेचा मुद्दा संसदेत गाजणार; राज्यसभेत विरोधकांची चर्चेची मागणी

शाह यांच्या टीकेला तृणमूलचे प्रत्युत्तर; दिल्ली सांभाळण्याचा गृहमंत्र्यांना दिला सल्ला

विरोधी पक्षांकडून घालण्यात आलेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर पुन्हा गोंधळास सुरुवात झाली. अखेरीस अखेरीस लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभाdelhi violenceदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेस