शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Delhi Violence : 'त्या' माऊलीने दोन मुलींसह पहिल्या मजल्यावरून घेतली उडी; कारण वाचून हादराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 7:27 PM

Delhi Violence : या घटनेमुळे मायलेकींवर खूप मोठा परिणाम झाल्याचे अहमद यांनी सांगितले.

ठळक मुद्देईशान्य दिल्लीतील अल-हिंद हॉस्पिटलमध्ये 45 वर्षीय महिलेने ही आपबिती सांगितली आहे.  जमावाने त्याच्या पाठीवर एक केमिकल ओतले त्यामुळे त्याची त्वचा जळाली. दंगेखोरांच्या जमावाने महिलांची छेडछाड करत त्यांचे कपडे देखील फाडल्याच्या धक्कादायक घटना दिल्लीत घडल्या आहेत.

नवी दिल्ली -  CAA वरून दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आगडोंब उसळला असून एका आईने आपबिती सांगितली आहे. छेडछाडीपासून बचाव करण्यासाठी या माऊलीने दोन मुलींसह अंगाला ओढणी बांधून पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला आणि दंगेखोरांपासून सुटका मिळवली.  ईशान्य दिल्लीतील अल-हिंद हॉस्पिटलमध्ये 45 वर्षीय महिलेने ही आपबिती सांगितली आहे. 

Delhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

दंगेखोरांच्या जमावाने महिलांची छेडछाड करत त्यांचे कपडे देखील फाडल्याच्या धक्कादायक घटना दिल्लीत घडल्या आहेत. करावल नगरमध्ये स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या महिलेने डोळ्यात अश्रू आणत सांगितले की, “जमावाने आत प्रवेश केला तेव्हा मी घरी होते. मी आणि माझ्या दोन मुलींचा विनयभंग केला आणि आमचे कपडे जमावाने फाडले.” नंतर जमावाने त्यांचा पाठलाग केला. परंतु ते थांबले आणि शेवटी कुठे गायब झाले. नंतर त्या मायलेकींनी किराणा दुकानातील मालक अयूब अहमद यांच्या घरी आश्रय घेतला."जेव्हा आम्ही अहमदच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याने आम्हाला जेवण व इतर आवश्यक वस्तू दिल्या आणि नंतर आम्हाला अल हिंद रुग्णालयात दाखल केले. तेथे मी आमच्या परिसरातील रहिवाशांना ओळखले होते." असं पुढे त्या म्हणाल्या. या घटनेमुळे मायलेकींवर खूप मोठा परिणाम झाल्याचे अहमद यांनी सांगितले.हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीत सशस्त्र जमावांनी हल्ला केल्यावर गेल्या काही दिवसांपासून अल-हिंद हॉस्पिटलमध्ये आणलेल्या अनेकांपैकी ही एक महिला आहे. प्रत्येकाशी निगडित हिंसाचाराच्या  भयानक अनुभव आहेत. करवल नगर येथे राहणारा २० वर्षीय सलमान खानने सांगितले की, मंगळवारी रात्री तो आपल्या घराजवळ होता. तेव्हा जमावाने त्याच्या पाठीवर एक केमिकल ओतले त्यामुळे त्याची त्वचा जळाली. तो पुढे म्हणाला, "काही अज्ञात लोकांनी मला माझ्या घराजवळ पकडून माझ्या पाठीवर ज्वलनशील पदार्थ ओतला. पदार्थ काय आहे याची मला कल्पना नाही. तो खूप गरम पदार्थ होता आणि माझी त्वचा जळण्यास सुरवात झाली.''रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी त्यांना रुग्णालयात आणले असे सलमान म्हणाला. खासगी कंपनीत काम करणारे ३० वर्षीय अकील सैफी यांनी सांगितले की, गोकुळपुरी येथे हिंसाचाराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागातील काही लोकांनी त्याला मारहाण केली. "मी मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास कार्यालयातून घरी परत जात असताना अज्ञात लोकांनी माझे मोटारसायकल थांबवून मला मारहाण करण्यास सुरवात केली.  "माझ्या डाव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते आणि माझा मित्र बिलाल यांना किरकोळ दुखापत झाली," तो पुढे म्हणाला.

टॅग्स :Molestationविनयभंगdelhi violenceदिल्लीdelhiदिल्लीhospitalहॉस्पिटल