शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: दिल्लीत दुसऱ्यांदा 1984ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही- हायकोर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 16:02 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून उत्तरपूर्व दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात हिंसाचार उफाळून आला आहे.

ठळक मुद्देदिल्लीत हिंसाचार माजल्यानंतर 72 तासांपर्यंत दिल्ली पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. या काळात 18 जणांचा बळी गेला होता. दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली असून, त्यावर सुनावणी झाली आहे. आमच्या डोळ्यांदेखत दिल्लीत दुसऱ्यांदा 1984ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही.

नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून उत्तरपूर्व दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात हिंसाचार उफाळून आला आहे. दिल्लीत हिंसाचार माजल्यानंतर 72 तासांपर्यंत दिल्ली पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. या काळात 18 जणांचा बळी गेला होता. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचाही समावेश असून, शेकडो जण रुग्णालयात दाखल आहेत. अनेकांना गोळी लागली आहे. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली असून, त्यावर सुनावणी झाली आहे.माकपा नेते वृंदा करात यांच्या तक्रारीनंतर अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्याविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल करावा की नाही, यावर न्यायालय 28 फेब्रुवारीला निर्णय देणार आहे. यादरम्यान पोलीस आयुक्तांचं प्रतिनिधित्व करण्याच्या मुद्द्यावर सॉलिसीटर जनरल आणि दिल्ली सरकारचे अधिवक्त्यांमध्ये चर्चा झाली. न्यायालयानं या प्रकरणात तीन ते पाच तासांच्या दरम्यान तीनदा सुनावणी घेतली आहे. तिसऱ्यांदा सुनावणीदरम्यान न्यायालयानं केंद्र आणि राज्य दोघांच्याही प्रतिनिधींना पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना खासगी स्वरूपात भेटण्यास सांगितलं आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची वेळ आली आहे. न्यायमूर्ती मुरलीधर म्हणाले, आता झेड सिक्युरिटी सर्वांसाठी असल्याचं सांगण्याची वेळ आली आहे. आमच्या डोळ्यांदेखत दिल्लीत दुसऱ्यांदा 1984ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. यावर तातडीने कार्यवाही करता यावी, यासाठी न्यायालयानं रात्रीचे दंडाधिकारी नेमण्याचा सल्ला दिला आहे. प्रशासनानं कारवाई केल्यास बरंच काही घडू शकतं. पोलिसांना लोकांना सर्व सुविधा देण्यास सांगण्यात आले होते, जेणेकरून त्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्काराच्या वेळी सुरक्षा देता येईल. झुबिदा बेगम कोर्टाच्या नोडल अधिकारी असतील. त्या पीडितांशी समन्वय साधतील आणि कोर्टाच्या आदेशांचे पालन करतील, असा विश्वासही न्यायालयानं व्यक्त केला आहे. तसेच त्यांना गृह मंत्रालयाकडून आवश्यक मदतही पुरवली जाईल. न्यायालय पुढील सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

टॅग्स :delhi violenceदिल्लीCourtन्यायालय