शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तुंबळ हाणामारी! शौचालयावरून दोन गट भिडले; एकमेकांच्या जीवावर उठले, अनेकांची फुटली डोकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 18:20 IST

Two groups clashed over public toilets : सार्वजनिक शौचालयाच्या वापरावरून दोन गटात जोरदार राडा झाला आहे. लाठ्या-काठ्यांनी, दगड-विटांनी एकमेकांवर हल्ला केला.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. लोकांमध्ये विविध कारणांमुळे वाद होतात. कधी कधी क्षुल्लक कारणांमुळे सुरू झालेले वाद पुढे टोकाला जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयाच्या वापरावरून दोन गटात जोरदार राडा झाला आहे. लाठ्या-काठ्यांनी, दगड-विटांनी एकमेकांवर हल्ला केला. नागरिकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. काहींचं डोकं फुटलं आहे. सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील गीता कॉलनी परिसरात नव्याने सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. या भागात राहणाऱ्या बुद्ध बाजार परिसरातील नागरिक त्याचा वापर करत असतात. मात्र लोकसंख्येच्या मानाने शौचालयांची संख्या कमी असल्यामुळे येथे नंबर लावण्यावरून सतत नागरिकांमध्ये छोटीमोठी भांडणं होत असतात. यासाठी नंबर लावण्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर दोन गट आमनेआमने आले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. लोकांनी मिळेल त्या वस्तू एकमेकांवर फेकल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. 

हाणामारीत अनेक नागरिक जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त झालेल्या लोक काहीच ऐकून घेण्यास तयार नव्हते. पोलिसांनी जास्तीचा फौजफाटा बोलावून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. लोकांना समजवण्यासाठी, शांत करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. या हाणामारीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील साधारण पाच ते सहाजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

सार्वजनिक शौचालयामुळे नेहमीच होतो वाद

दिल्ली पोलिसांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, एका गटातील नंदलाल, करण, सचिन, बिरजू, मुकेश हे जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या गटातील लक्की, ध्रुव, बहुवा आणि अन्य काही जण हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असून अनेकांनी चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करायला सुरुवात केली असून यातील आरोपींचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक शौचालयामुळे नेहमीच वाद होत असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस