दिल्ली हादरली! उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये भूकंपाचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 23:07 IST2021-02-12T23:00:24+5:302021-02-12T23:07:58+5:30
earthquake in India, Tajikistan : उत्तर भारताच्या दिल्ली एनसीआर, जम्मू आणि काश्मीर, नोएडा, उत्तराखंडमध्ये हा धक्का जाणवला. याची तीव्रता अद्यास समजू शकली नसली तरीही या भूकंपाचे केंद्र जम्मू काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली हादरली! उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये भूकंपाचा धक्का
उत्तराखंडमध्ये काही दिवसांपूर्वी हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सारा देश हादरला असताना काही वेळापूर्वी दिल्ली, उत्तराखंड, नोएडामध्ये भूकंपाचा धक्का जाणविल्याने खळबळ उडाली आहे. (Earthquake tremors felt in parts of Jammu. Uttarakhand and Noida, Delhi)
उत्तर भारताच्या दिल्ली एनसीआर, जम्मू आणि काश्मीर, नोएडा, उत्तराखंडमध्ये हा धक्का जाणवला. याची तीव्रता अद्यास समजू शकली नसली तरीही या भूकंपाचे केंद्र जम्मू काश्मीरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. हे धक्के राजस्थान आणि पंजाबमध्येही जाणवल्याने भूकंपाची तीव्रता जास्त असण्याची भीती व्यक्त होत आहे.
An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale hit Amritsar, Punjab at 10:34pm today: National Centre for Seismology
— ANI (@ANI) February 12, 2021
पंजाबच्या अमृतसरमध्ये हे भूकंपाचे केंद्र असल्याचे स्पष्ट झाले असून 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. रात्री 10.34 मिनिटांनी हा धक्का जाणवल्याचे सांगण्यात आले.
तर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का बसला. हा धक्का रात्री 10.31 मिनिटांनी बसला आहे.
An earthquake of magnitude 6.3 on the Richter scale hit Tajikistan at 10:31pm today: National Centre for Seismology
— ANI (@ANI) February 12, 2021