दिल्लीत भटकी कुत्री पेलणार सुरक्षेचा भार

By Admin | Updated: August 10, 2014 03:01 IST2014-08-10T03:01:45+5:302014-08-10T03:01:45+5:30

राजधानीतील रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री लवकरच तुम्हाला पोलीस प्रशिक्षण केंद्रात विविध प्रकारचे प्रशिक्षण घेताना दिसून येतील.

In Delhi, a stray dog ​​can get the weight of security | दिल्लीत भटकी कुत्री पेलणार सुरक्षेचा भार

दिल्लीत भटकी कुत्री पेलणार सुरक्षेचा भार

>नवी दिल्ली : राजधानीतील रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री लवकरच तुम्हाला पोलीस प्रशिक्षण केंद्रात विविध प्रकारचे प्रशिक्षण घेताना दिसून येतील. या प्राण्यांचे सुरक्षा श्वानांत रूपांतर करण्याची महापालिकेची योजना आहे. 
नवी दिल्लीतील काही रहिवाशांनी भटकी कुत्री पाळली असली तरी त्यांना महापालिकेचे सुरक्षा श्वान म्हणून एक ओळख देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पोलीस प्राणी प्रशिक्षकांच्या मदतीने आम्ही या श्वानांचे रक्षक श्वानात रूपांतर करून त्यांना नव्याने स्थापन केलेल्या ‘मे आय हेल्प यू’ या शहर सुरक्षा दलासोबत तैनात करणार आहोत, असे दिल्ली प्रशासनाने सांगितले. 
हे श्वान नवी दिल्ली महापालिका भागात केवळ फिरले तरी त्याने सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळेल, असे महापालिकेचे अध्यक्ष जलाज श्रीवास्तव यांनी सांगितले. 
या श्वानांना पाळून त्यांना रक्षक श्वानांचे प्रशिक्षण देण्याची आमची योजना आहे. भटक्या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आतार्पयत 4क् प्रशिक्षकांना नियुक्त करण्यात आले असून आणखी 7क्क् प्रशिक्षक नेमले जाणार आहेत. 
भटक्या कुत्र्यांमुळे भारतात श्वानदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. श्वानांना दत्तक घेण्याच्या योजनेतून दोन लाभ होतील. एक म्हणजे रस्त्यावरील भटकी कुत्री हटविली जातील. त्यामुळे श्वानदंशाची समस्या सुटेल व दुसरा लाभ म्हणजे हे शहर अधिक सुरक्षित बनेल.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
42क्क्1 च्या कायद्याद्वारे भटक्या श्वानांना ठार मारण्यास मनाई करण्यात आल्यानंतर रस्त्यांवरील भटक्या श्वानांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली. हे श्वान रस्त्यांवरील कचराकुंडय़ा आणि रहिवाशांनी दिलेल्या अन्नावर जगतात. 
4देशातील अनेक शहरे लसीकरण आणि निजर्तुकीकरण कार्यक्रम राबवत असली तरी रेबीजमुळे भारतात दरवर्षी 2क् हजार नागरिकांचा बळी जातो व हे प्रमाण रेबीजच्या जागतिक मृत्यूदराच्या एक तृतीयांश एवढे आहे. 

Web Title: In Delhi, a stray dog ​​can get the weight of security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.