Delhi Railway Station Stampede Deaths: नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर शनिवारी (१५ फेब्रुवारी) दुर्देवी घटना घडली. प्रवाशांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. यात ९ महिलांसह १८ जणांचा मृत्यू झाला. यात अनेकजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होती. एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी धावपळ सुरू झाली आणि ही घटना घडली. मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. मृतांमध्ये ५ मुलांचाही समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर १५ फेब्रुवारीच्या रात्री १० वाजता अभूतपूर्व स्थिती बघायला मिळाली. महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काय घडलं?
प्रयागराज एक्स्प्रेस जेव्हा प्लॅटफॉर्म क्रमांक १४ उभी होती, तेव्हाच प्रवाशांची संख्या वाढू लागली. त्यात स्वर्ण त्राता सेनानी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस या गाड्यांना विलंब झाला होता. या दोन्ही गाड्यांच्या प्रतिक्षेत असलेले प्रवाशी प्लॅटफॉर्म क्रमांक १२,१३ आणि १४ वर होते.
याच वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १६ वरील जिन्याजवळ अचानक लोक धावायला लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि १८ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैक ९ जण बिहारचे, ८ लोक दिल्लीचे तर एक जण हरयाणाचा आहे.
चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची नावे
आहा देवी (वय ७९ वर्ष, बिहार)
पिंकी देवी (वय ४१ वर्ष, दिल्ली)
शीला देवी (वय ५० वर्ष, दिल्ली)
व्योम (वय २५ वर्ष, दिल्ली)
पूनम देवी (वय ४० वर्ष, बिहार)
ललिता देवी (वय ३५ वर्ष, बिहार)
सुरूची पुत्री (वय ११ वर्ष, बिहार)
कृष्णा देवी (वय ४० वर्ष, बिहार)
विजय साह (वय १५ वर्ष, बिहार)
नीरज (वय १२ वर्ष, बिहार)
शांती देवी (वय ४० वर्ष, बिहार)
पूजा कुमार (वय ८ वर्ष, बिहार)
संगीता मलिक (वय ३४ वर्ष, हरयाणा)
पूनम वीरेंद्र सिंह (वय ३४ वर्ष, दिल्ली)
ममता झा (वय ४० वर्ष, दिल्ली)
रिया सिंह (वय ७ वर्ष, दिल्ली)
बेबी कुमारी (वय २४ वर्ष, दिल्ली)
मनोज कुशवाह (वय ४७ वर्ष, दिल्ली)