शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही तोंड उघडलं तर अडचणीत याल"; अजित पवारांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांकडून जशास तसे उत्तर
2
US Airstrikes Venezuela: व्हेनेझुएलावर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक? विमानांमधून लष्करी तळांवर बॉम्बवर्षाव, संरक्षणमंत्र्यांच्या घरावर हल्ला
3
LIC चं न्यू ईयर गिफ्ट; बंद पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार, लेट फी वर मिळतेय १००% पर्यंत सूट
4
अभिमानास्पद! ऑस्करने घेतली मराठी सिनेमाची दखल, मुख्य श्रेणी स्पर्धेत 'दशावतार'ची निवड
5
१ मार्चपासून ATM मधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य
6
भयंकर! वय २२, तीन बायका, ७ मुलांचा बाप... चौथ्या लग्नाच्या नादात गर्भवती पत्नीची केली हत्या
7
"आम्ही हिंदू अधिकारी संतोषला जाळले," बांगलादेशी नेत्याचा पोलिस ठाण्यात खळबळजनक दावा
8
फोनचा एअरप्लेन मोड फक्त विमानासाठी नाही! रोजच्या आयुष्यात करा असा वापर; होतील ७ मोठे फायदे
9
मुस्ताफिजुर रहमान बाबत निर्णय झाला, संघातून वगळण्याचे बीसीसीआयचे केकेआरला आदेश
10
सावधान! फोनचे 'ब्लूटूथ' ऑन ठेवणं पडू शकतं महागात; क्षणात बँक खातं होईल रिकामं!
11
पौष पौर्णिमा २०२६: आजची रात्र भाग्याची! फक्त पाणी आणि अक्षता वापरून करा 'हा' इच्छापूर्ती उपाय
12
"लग्न लावून दिलंत तर..."; मैत्रिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीची धमकी, थेट नवरीलाच पळवलं
13
७ जानेवारीला उघडणार ४५ वर्ष जुन्या कंपनीचा IPO; किती करावी लागणार गुंतवणूक, प्राईज बँड किती? जाणून घ्या
14
सोमवारी तळहातावरील गुरु पर्वतावर लावा हळदीचा टिळा; 'पुष्य नक्षत्रा'च्या मुहूर्तावर उघडेल भाग्याचे द्वार!
15
व्हिडीओ घेऊ नका...! वडिलांना घेऊन रुग्णालयातून बाहेर पडताना श्रद्धा कपूर पापाराझींवर भडकली
16
Mithun Chakraborty : "जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब..."; मिथुन चक्रवर्ती कडाडले, ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
Nashik Municipal Election 2026 : गटबाजीच्या खेळात प्रभाग २५ मध्ये दोन ठिकाणी कमळ कोमेजले, असे का घडले?
18
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
19
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
20
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 17:59 IST

"ज्या दिवशी ४० लाख लोक दिल्लीच्या रस्त्यावर येतील, यांना यांची आजी आठवेल..."

दिल्लीतील जंतरमंतर येथे रविवारी (२९ जून) आम आदमी पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील झोपडपट्ट्या तोडण्याच्या विरोधात, हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि रेखा गुप्ता सरकारवर थेट हल्ला चढवला आणि भाजप दिल्लीतील झोपडपट्ट्या पाडण्याचा (तोडण्याचा) कट रचत असल्याचा आरोप केला.

"ज्या दिवशी ४० लाख लोक दिल्लीच्या रस्त्यावर येतील, यांना यांची आजी आठवेल" -अरविंद केजरीवाल म्हणाले, "मी भाजप एका मोठ्या नेत्यासोबत बोलत होतो, ते म्हणाले, आम्ही दिल्लीतील सर्व झोपडपट्ट्या पाडणार. दिल्लीतील सर्व झोपडपट्ट्या पाडण्याचा यांचा कट आहे. दिल्लीतील ४० लाख लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. संघटित व्हा. ज्या दिवशी ४० लाख लोक दिल्लीच्या रस्त्यावर येतील, यांना यांची आजी आठवेल. तुमची ताकद तुमची एकता आहे. संघटित व्हा." 

"याच जंतरमंतरवरील आंदोलनाने काँग्रेसचा सफाया झाला..." -केजरीवाल पुढे म्हणाले, "आज या व्यासपीठावरून मी भारतीय जनता पक्षाला इशारा देत आहे की, झोपडपट्ट्या पाडणे थांबवा, आपण आपल्या मर्यादेत राहा, नाहीतर एवढे मोठे आंदोलन होईल की, तुमचे सिंहासनही हादरेल." एवढेच नाही तर, "याच जंतरमंतरवरील आंदोलनाने काँग्रेसचा सफाया झाला. आता आपण झोपडपट्ट्या तोडणे थांबवले नाही तर रेखा गुप्ता सरकार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ टिकणार नाही."

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपPoliticsराजकारणdelhiदिल्लीBJPभाजपा