राजधानी दिल्लीतील उत्तर पश्चिम दिल्ली परिसरातील दयालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुंगानगर परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. येथे अब्दुल नावाच्या एका व्यक्तीने त्याची ४० वर्षीय पत्नी आणि १७ वर्षांच्या मुलावर गोळ्या झाडल्या. जखमी आई आणि मुलाला गंभीर अवस्थेत जग प्रवेशचंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अब्दुल हा मुळचा जहांगीरपुरी परिसरातील रहिवासी आहे. आज त्याने पत्नी आणि मुलावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र हा गोळीबार का झाला, याबाबतचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आता पीडितांचे जबाब आणि पुराव्यांच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आज दिलल्लीतील मंगोलपुरी परिसरातही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दहावीत शिकणाऱ्या व्योम नावाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. व्योम आणि आरोपींमध्ये आधी वाद झाला होता. त्यावेळी व्योम याने त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर आरोपींनी आपल्या इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन व्योमवर हल्ला केला आणि त्याला बेदम मारहाण केली. अखेरीस त्याचा मृत्यू झाला.
Web Summary : In Delhi, a man shot his wife and son. Both are critically injured and hospitalized. The motive is unknown. Separately, a student died after being attacked following an argument in Mangolpuri.
Web Summary : दिल्ली में एक व्यक्ति ने अपनी पत्नी और बेटे को गोली मार दी। दोनों गंभीर रूप से घायल हैं। कारण अज्ञात है। मंगोलपुरी में एक छात्र की बहस के बाद हमले में मौत हो गई।