शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ही कसली शाळा?... वेळेत फी भरली नाही म्हणून ५९ चिमुरड्यांना कोंडलं, ४० डीग्री तापमानात लाही-लाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 11:46 IST

चिमुरड्यांना पाच तास शाळेच्या तळघरात कोंडून ठेवण्याचा संतापजनक प्रकार

नवी दिल्ली : दिल्लीच्या बल्लीमारान परिसरात असलेल्या राबिया गर्ल्स पब्लिक स्कूलमध्ये शाळेची फी वेळेत भरली नाही म्हणून तब्बल ५९ चिमुरड्यांना पाच तास शाळेच्या तळघरात कोंडून ठेवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे  ४० डिग्री तापमानात काहीही खाण्यास न देता मुलींना उपाशी कोंडून ठेवण्यात आले होते. शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी मुलींचे पालक शाळेत पोहोचले असता त्यांना हा प्रकार समजला.

शाळेतील खोलीत कोंडून ठेवलेल्या मुली पालकांना पाहून जोरजोरात रडू लागल्या. तसेच आपल्या मुलींची अशी अवस्था पाहिल्यावर पालकांना जबरदस्त धक्काच बसला. मुलींच्या पालकांनी याबाबत राबिया स्कूल प्रशासनाला जाब विचारला असता त्यांनी याचे समाधानकारक उत्तर दिले नाही. फी साठी मुलांच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या या शाळेवर  कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलींच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

शाळेने ५९ विद्यार्थिनींना शाळेच्या तळघरात बंद करून ठेवलं होतं. तसेच ज्या खोलीत मुलींना ठेवण्यात आले होते तिथे एक साधा पंखाही नव्हता. मुलींच्या रडण्याचा आवाज बाहेर येत होता. तसेच खोलीला बाहेरून कडी लावण्यात आल्याचा आरोप मुलींच्या पालकांनी केला आहे. अनेक पालकांनी पोलिसांना जून महिन्याची फी भरल्याच्या पावत्या दाखवल्या. ४० डिग्री तापमानात पाच तास मुलींना उपाशी ठेवल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका फरहा डीबा खान यांना विचारलं असता त्यांनी पालकांनाच दमदाटी करत मुलींना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दिल्लीसह देशभरात शाळेच्या या कृत्याबाबत संतापाची लाट उसळली आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीSchoolशाळाStudentविद्यार्थी