Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:44 IST2025-11-12T10:43:08+5:302025-11-12T10:44:04+5:30
Dr. Umar i20 Car Information, Delhi Red Fort Car Blast Updates: ज्या कारमधून स्फोट घडवून आणला, त्या संबंधी मोठा खुलासा झाला आहे

Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
Dr. Umar i20 Car Information, Delhi Red Fort Car Blast Updates: सोमवारी राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. देशभरातील विविध राज्यांमध्ये सतत छापे टाकले जात आहेत. पोलिसांनी आतापर्यंत १८ हून अधिक लोकांना अटक केली आहे. शिवाय, स्फोटात सहभागी असलेल्या कारबाबत सतत नवीन माहिती समोर येत आहे. लाल किल्ला स्फोटात सहभागी असलेल्या i20 कारबाबत नवी अपडेट मिळाली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, डॉ. उमर याची i20 कार गेल्या १० दिवसांपासून अल-फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पार्क करण्यात आली होती.
मुजम्मिलच्या कारशेजारी पार्क होती i20 कार
डॉ. उमरची i20 कार डॉ. मुझम्मिलच्या स्विफ्ट कारच्या शेजारीच पार्क करण्यात आली होती. स्विफ्ट कार डॉ. शाहीन हिच्या नावावर रजिस्टर्ड आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की i20 कार २९ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान तिथे पार्क करण्यात आली होती. ही कार २९ ऑक्टोबरला कार PUC करण्यासाठी बाहेर काढण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारमध्ये तीन लोक दिसले. १० नोव्हेंबरला सकाळी घाबरलेल्या डॉ. उमर तीच i20 कार घेऊन विद्यापीठाबाहेर पडला. त्यानंतर ही कार प्रथम कॅनॉट प्लेसमध्ये आणि नंतर मयूर विहार परिसरात दिसली आणि मग चांदणी चौकातील सुनहरी मस्जिद पार्किंगमध्ये पार्क केलेली दिसली. टीव्हीनाइनने तपास संस्थांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मॉड्यूलचा हँडलर परदेशातून काम करत होता.
फॉरेन्सिक चाचणीत काय?
या स्फोटाच्या फॉरेन्सिक चाचण्यांमध्ये अमोनियम नायट्रेटसह उच्च दर्जाच्या लष्करी स्फोटकांचा वापर उघड झाला. दिल्ली पोलिस आणि एजन्सी आता परदेशी कनेक्शनची चौकशी करत आहेत. लाल किल्ल्यासमोर स्फोट झालेल्या कारने लाल किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी दिल्लीच्या विविध भागांना भेट दिली होती, त्यापैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे कॅनॉट प्लेस. कार घटनेच्या दिवशी दुपारी २:३० वाजता तिथे पोहोचली आणि त्यानंतर लगेचच निघून गेली. त्यापूर्वी कारने मयूर विहारलाही भेट दिली होती. नंतर मात्र कार तीन तास एकाच ठिकाणी पार्किंगमध्ये उभी राहिली आणि त्यानंतर लाल किल्ल्याजवळ स्फोट घडला.