शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
3
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
4
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
5
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
6
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
7
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
8
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
9
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
10
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
11
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
12
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
13
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
14
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
15
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
16
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
17
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
18
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
19
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:53 IST

Delhi Red Fort Car Blast Updates: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १०हून जास्त लोकांचा मृत्यू

Delhi Red Fort Car Blast Updates: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १०हून जास्त लोकांचा मृत्यू झाला. हा स्फोट घडवून आणण्यामागे कुणाचे आर्थिक पाठबळ होते, कुणाचे फंडिंग होते? या गोष्टींची चौकशी केली जाणार आहे. ईडी आणि इतर एजन्सींसह NIA ही चौकशी करेल. अल-फलाह विद्यापीठाचाही संपूर्ण फॉरेन्सिक तपास व चौकशी केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, एनआयएचे महासंचालक आणि गृह मंत्रालयाच्या इतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

कुणी दिले पैसे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की एनआयए, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर आर्थिक तपास संस्थांसह, लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील आर्थिक बाबींची म्हणजे फंडिंगची चौकशी करेल. अल-फलाह विद्यापीठाची फॉरेन्सिक चौकशी देखील केली जाईल. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर आर्थिक तपास संस्था विद्यापीठाशी संबंधित एका डॉक्टरच्या आर्थिक व्यवहारांची देखील चौकशी करतील. या संपूर्ण प्रकरणात टेरर फंडिंग आणि मनी लाँडरिंगसारख्या आर्थिक बाबींची चौकशी केली जाईल.

डॉक्टर फारुखला उत्तर प्रदेशातून अटक

या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील हापूर येथील डॉक्टर डॉ. फारूक यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ. फारूक हा जीएस मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे आणि त्याने अल-फलाह विद्यापीठातून एमबीबीएस केले आहे. बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात डॉ. फारूकची चौकशी सुरू आहे.

अल-फलाह विद्यापीठाला NAAC कडून नोटीस जारी

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. यंत्रणांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. स्फोटांप्रकरणी फरिदाबाद येथील अल-फलाह मेडिकल कॉलेज चौकशीच्या कक्षेत आहे. दरम्यान, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (NAAC) अल-फलाह विद्यापीठाने त्यांच्या वेबसाइटवर मान्यता दाखवली होती, ही मान्यता खोटी आहे. या प्रकरणी आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Terrorists' funding source probed, everyone's records scrutinized.

Web Summary : Following the Delhi Red Fort blast, NIA and ED will investigate the funding sources. Al-Falah University is under scrutiny. A doctor from Uttar Pradesh is detained for questioning related to the blast. NAAC issued a notice to Al-Falah University regarding false accreditation claims.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाcarकारBlastस्फोटAmit Shahअमित शाहTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी