शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ISIS मॉड्यूलच्या वॉन्टेड सदस्याला दिल्लीत अटक; डोक्यावर होते तीन लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 10:54 IST

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला अटक केली आहे.

Pune ISIS Module Case : मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वी पुण्यातून अटक करण्यात आली होती. पुण्यातील कोंढव्यातील एका इमारतीमध्ये या दहशतवाद्यांनी  बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास करत काही जणांना अटक केली. आता या प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत गेल्याचे समोर आलं आहे. दिल्लीत या प्रकरणाशी संबधित महत्त्वाच्या आरोपीला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शुक्रवारी सकाळी पुणे आयसिस मॉड्यूलचा महत्त्वाचा सदस्य रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक केली. अलीवर तीन लाख रुपयांचे बक्षीस होते. रिझवान अली हा या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.  अलीच्या अटकेसाठी अलीच्या अटकेसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वॉरंट जारी केले होते. पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाल्यानतंर तो पकडले जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होता. मात्र अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली.

दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असलेल्या अलीने पुणे आयसिस मॉड्यूलच्या इतर सदस्यांसह दिल्ली आणि मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल आणि महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा केली होती. पोलिसांनी अलीच्या ताब्यातून काही शस्त्रे देखील जप्त केली आहेत. पुणे आयसिस मॉड्यूलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलीस आणि एनआयएने यापूर्वीच अटक केली आहे.

पुणे आयसिस मॉड्यूल काय आहे?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने जुलै २०२३ मध्ये पुण्यात शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि आयसिसशी संबंधित साहित्य बाळगल्याप्रकरणी एकूण ११ जणांवर आरोपी ठरवलं होतं. मार्चमध्ये एनआयएने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवान अलीसह अन्य तीन आरोपींची नावे होती. यातील सर्व आरोपी हे दहशतवादी संघटना आयसिसशीचे सदस्य होते. दहशतवादी कारवांच्या पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी त्यांनी मोठा कट रचला होता.

हे आरोपी सिक्रेट कम्युनिकेशन ॲप्सद्वारे त्यांच्या परदेशातील हँडलरच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आलं आहे. आरोपी हे सशस्त्र दरोडे आणि चोरी करून दहशतवादी कारवाईसाठी निधी गोळा करत होते. पुण्याच्या कोंढवा परिसरातील एका इमारतीमध्ये आरोपींनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देखील घेतलं होतं. 

टॅग्स :PuneपुणेISISइसिसterroristदहशतवादीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाdelhiदिल्ली