शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घातपाताचा मोठा कट उधळला! दिल्लीत पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, 5 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 10:52 IST

Delhi Police Special Cell Arrested 5 Persons : लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये घातपाताचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे.  दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर साठा जप्त केला आहे. हे सर्व दहशवादी इस्लामिक आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील दोन जण पंजाब तर तीन जण काश्मीरचे आहेत. शस्त्र तसेच इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे". या सर्व दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा होती अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे

रविवारी कुपवाडा येथील गुलगाम परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन करून 5 किलो स्फोटकं, 2 डेटोनेटर्स आणि 2 पोस्टर्स हस्तगत केली आहेत. त्यामुळे पुढे होणार घातपात टळला आहे. सीमेवर  दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर परिसरात सुरक्षा दल आणि पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला देखील केला आहे. ही घटना श्रीनगरच्या हवल सजगीरपोरा परिसरात घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी आहे.

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केला हल्ला 

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलमगिरी बाजार परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हल्ला करून लक्ष्य केले. फारूख अहमद असं जखमी झालेल्या पोलीस जवानाचं नाव आहे तर दुसरा नागरिक असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीTerrorismदहशतवादterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाPoliceपोलिस