धक्कादायक! चिमुकल्याच्या समोरच पित्यावर अज्ञातांचा गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 19:03 IST2019-04-01T19:02:02+5:302019-04-01T19:03:25+5:30
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

धक्कादायक! चिमुकल्याच्या समोरच पित्यावर अज्ञातांचा गोळीबार
नवी दिल्ली- देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. न्यू उस्मानपूर भागात एका 5 वर्षांच्या चिमुकल्यासमोरच त्यांच्या वडिलांवर अमानुषपणे गोळीबार करण्यात आला आहे. पूर्व दिल्लीतल्या वेलकम भागात काही गुंडांनी पहिल्यांदा हवेत गोळीबार केला, त्यानंतर त्यांनी मेहताब नावाच्या एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. त्या गोळीबारात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
न्यू उस्मानपूर भागात राहणाऱ्या अकीबुद्दीन याचा गोळीबारात मृत्यू झाला. अकीबुद्दीन डीटीसी बसचा ड्रायव्हर आहे. अज्ञात गुंडांनी मारलेली गोळी अकीबुद्दीच्या डोळ्यांच्या आसपास लागली. अकीबुद्दीन रात्री 10 वाजताच्या दरम्यान स्वतःची बहीण आणि 5 वर्षांच्या मुलासोबत कुठून तरी घरी परतत होता. परंतु मध्येच रस्त्यात अकीबुद्दीन स्वतःच्या मुलाबरोबर एका दुकानात थांबला, तर त्याची बहीण पुढे निघून गेली. त्याचदरम्यान 5 जण वेगवेगळ्या बाइकवरून आले. त्याच लोकांनी अकीबुद्दीनवर गोळीबार केला.
आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अकीबुद्दीनला सहा मुलं आहेत. पोलीस पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून पोलीस स्टेशन फक्त 200 मीटर अंतरावर आहे. अकीबुद्दीनच्या बहिणीनं त्यांची हत्या कट रचून केल्याचा आरोप केला आहे.