शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तरेतही परिणाम; राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 11:46 IST

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत असून, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ठळक मुद्देतौक्ते चक्रीवादळाचा उत्तर भारतात परिणामचक्रीवादळ राजस्थानपासून ते हरयाणापर्यंत जाणारअनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

नवी दिल्ली: कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा तडाखा दिल्यानंतर तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. यामुळे कोकणासह गुजरातमधील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गेल्या २ ते ३ दिवसांपासून वीज गायब असून, शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तौक्ते चक्रीवादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे सरकत असून, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (delhi north india rajasthan thunderstorm heavy rain imd alert cyclone tauktae)

तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम उत्तर भारतातही दिसून येत असून, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीत पावसाच्या सरी कोसळत असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील काळात याच भागात मुसळधार पाऊसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील अतरौली, जट्टारी, खुर्जा, आग्रा, मुजफ्फरनगर, बिजनौर, मथुरा, बरसाना, नंदगांव आणि राजस्थानमधील कोटपुतली, खैरथल, भिवारी, महानीपुर बालाजी, महानीपूर बालाजी, महावा, नागौर, अलवर, भरतपूर, डीग येथे मुसळधार पाऊस पडू शकतो, असे सांगितले जात आहे. 

बिहारमध्ये PM केअर्समधील २५ व्हेंटिलेटर ९ महिनांपासून धूळखात; एकदाही वापर नाही!  

चक्रीवादळ राजस्थानपासून ते हरयाणापर्यंत

तौक्ते चक्रीवादळ राजस्थानपासून ते हरयाणापर्यंत जाईल. हवामान विभागाने बुधवारी एनसीआरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला असून, यानुसार ५०- ६० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील आणि पाऊसही पडेल. वादळी वारे उत्तराखंडच्या दिशेने पुढे जातील. पुढच्या दोन दिवसांत हिमाचल प्रदेशातही पाऊस पडेल. वादळामुळे उत्तर भारताच्या काही भागांवरही परिणाम होईल. काही भागांमध्ये पाऊसही पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा ज्या राज्यांना तडाखा बसला, तेथे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे मध्य प्रदेशातील जबलपूर आणि भोपाळमध्ये मुसळधार पाऊस झाला. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यांतील १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले. ६ हजार ४० गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळRajasthanराजस्थानdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशHaryanaहरयाणा