शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 10:31 IST

दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 पर्यंत वाढल्याने वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे.हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 पर्यंत वाढल्याने वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे.दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदुषित हवेचा पट्टा निर्माण झाला होता.

नवी दिल्ली - दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खालावली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 245 पर्यंत वाढल्याने वातावरणातील प्रदुषणात वाढ झाली आहे. यामुळे रविवारी (13 ऑक्टोबर) दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदुषित हवेचा पट्टा निर्माण झाला होता. तीन महिन्यांनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदुषणात आणखी वाढ झाली आहे. 

दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. सध्या हरियाणातील अलिपूर खालसा (351) आणि पानिपत (339) येथील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. हरियाणातील कर्नाल येथे पराली जाळल्यानंतर धूर दिल्लीत येत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. 

सफर या प्रदूषण संसोधन संस्थेने परालीमुळे 15 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील प्रदूषणात सहा टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. पंजाब, हरियाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी कॅनॉट प्लेस परिसरात दिल्लीकरांना मास्क वाटले. 

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैमानिक व्ही. के सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून परतल्यामुळे वारे शांत आहेत. मात्र वाऱ्याची दिशा पश्चिम ते उत्तर पश्चिम अशी आहे. त्यामुळे पश्चिम आणि उत्तर पश्चिमेकडील प्रदूषित हवा पंजाब, हरियाणातून दिल्ली-एनसीआरकडे वाहत आहे. हरियाणातील पराली जाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र पंजाबमध्ये पराली मोठ्या प्रमाणात जाळल्या जातात. 11 ऑक्टोबरपर्यंत हे प्रमाण 45 टक्क्यांनी वाढले आहे अशी माहिती राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळातील आकडेवारीवरून मिळाली आहे. 

पंजाब, हरियाणामध्ये पराली जाळण्यावर बंदी असतानाही शेतकरी पारंपरिक पद्धतीने पराली जाळतात. सरकारकडून आधुनिक पद्धतीने पराली जाळण्यासाठी 50 ते 80 टक्के अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे जनजागृती मोहीम राबवली जाते. मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. दिल्ली-एनसीआरमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीpollutionप्रदूषणair pollutionवायू प्रदूषणArvind Kejriwalअरविंद केजरीवालPunjabपंजाब