शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

प्रेम की वेडेपणा? बोलणं बंद केल्याने हुशार विद्यार्थिनीची वाढदिवसाआधीच प्रियकराकडून क्रूरपणे हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:38 IST

दिल्लीत एका १८ वर्षीय विद्यार्थिनीची तिच्याच प्रियकराने निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Delhi Crime: दिल्लीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील मेहरौली परिसरात १८ वर्षीय मेहक जैनची हत्या करण्यात आली. दिल्लीच्या जहांगीरपुरी भागातील रहिवासी असलेली मेहक जैन ही रविवारी दररोजप्रमाणे दिल्ली विद्यापीठाच्या विवेकानंद कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. पण दुपारी अडीचच्या सुमारास मेहकच्या पालकांना फोन आला की त्यांच्या मुलीची हत्या झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मेहकचा खून करणाऱ्या अर्शकृतला अटक केली असून  त्याने आपला गुन्हा कबूल केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अर्शकृतने मेहकची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. 

हत्येच्या दिवशी मेहरोली येथील संजय वन पार्कमध्ये त्यांच्यात जोरदार वाद झाला. मेहकवर हल्ला करण्यासाठी अर्शकृतने स्कूटरमधून पेट्रोल आणि घरातील चाकू आणला होते. जानेवारीमध्येही ते या पार्कमध्ये आले होते त्यामुळे तिथल्या अनेक जागेविषयी अर्शकृतला माहिती होता. त्यामुळेच त्याने ही जागा निवडली होती. अर्शकृतने आधी मेहकची धारदार चाकूने हत्या केली आणि नंतर ओळख लपवण्यासाठी तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकला. त्यानंतर काही वेळाने अर्शकृतने सर्वांना सांगितले की त्याने मेहक जैनची चाकूने हत्या केली आहे आणि ती संजय वनमधील झुडपात पडून आहे. त्यानंतर पोलिसांनी अर्शकृतला सोबत नेऊन पार्कमधून मृतदेह शोधून काढला. पोलिसांनी मेहकचा मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा केले.

वाढदिवसाआधीच झाली हत्या

मेहक जैनचा १९ वा वाढदिवस फक्त पाच दिवसांवर होता आणि गेल्या महिन्याभरापासून ती या दिवसासाठी तयारी करत होती. पण रविवारी अर्शकृत सिंगने तिचे आयुष्य क्रूरपणे संपवले. इंग्रजीमध्ये बीए ऑनर्सची ही हुशार विद्यार्थिनी तिच्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून अनुवादक बनण्याचे स्वप्न पाहत होती. "तिने कोरियन भाषा शिकण्यास सुरुवात केली होती. ६ जून रोजीच्या तिच्या वाढदिवसाबद्दल ती खूप उत्सुक आहे. तिने अनेक ऑर्डर दिल्या होत्या. गेल्या दोन दिवसांत, तिने ऑर्डर केलेल्या वस्तूंसह पार्सल घरी पोहोचले होते," असं मेहकच्या बहिणीने सांगितले.

मेहक शिकत होती कोरियन भाषा

"मेहकला कोरियन भाषांतरकार होण्याची इच्छा होती आणि तिने गेल्या वर्षी लाजपत नगर येथे एका कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. ती एक चांगली विद्यार्थिनी होती आणि तिने इंग्रजीमध्ये बीए ऑनर्सचे पहिले वर्ष पूर्ण केले होते. वडील चांदणी चौकात कपड्यांच्या दुकानात काम करतात आणि आई शिक्षिका आहे. तिला नोकरी मिळवून कुटुंबाला मदत करायची होती," असेही मेहकच्या बहिणीने सांगितले.

मुलांशी बोलायला होता विरोध 

पोलिसांनी सांगितले की, अर्शकृत सिंग मेहकवर प्रेम करत होता. सिंग दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. दोघे गेल्या वर्षी शाळेतील एका निरोप समारंभात भेटले आणि मित्र बनले होते. त्यानंतर अर्शकृतने मेहकला त्रास देण्यास सुरुवात केली. अर्शकृत तिला इतर मुलांशी बोलू नको असं सांगायला लागला. त्यामुळे मेहकने त्याला दूर राहण्यास सांगितले. त्यानंतरही अर्शकृत तिचा पाठलाग करतच होता. कुटुंबियांनी मात्र दोघेही फक्त मित्र होतं असं म्हटलं. 

फेक अकाऊंटवरुन मेहकवर ठेवली पाळत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शकृतने गेल्या जुलैपासून जैनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता. पण मेहक दुसऱ्या मुलांसोबत बोलत असल्याचा संशय आणि राग अर्शकृत होता. ज्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. ती कुणासोबत चॅट करतेय का हे पाहण्यासाठी अर्शकृतने एका मुलाच्या नावाने फेक अकाउंट तयार केले होते. मेहकच्या फोनवर येणारे कॉल्स पाहून त्याला संशय आला की ती दुसऱ्या कोणाला तरी भेटत आहे. जर कोणी तिला फोन केला तर तो लगेच त्याने तुला का फोन केला? किंवा तू त्याच्याशी का बोलत आहेस? असं विचारायचा. अशातच मेहकच्या कुटुंबाने त्याला दूर राहून त्याच्या करिअरवर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस