शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर मोठा अपघात; स्कूल व्हॅनची डंपरला धडक, दोघांचा मृत्यू, 9 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 16:52 IST

दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवर स्कूल व्हॅन आणि डंपर यांच्यात झालेल्या धडकेनंतर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूल व्हॅनचा चालक आणि एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला

गाझियाबादच्या दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवर स्कूल व्हॅन आणि डंपर यांच्यात झालेल्या धडकेनंतर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूल व्हॅनचा चालक आणि एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्कूल व्हॅनमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त 11 मुलं प्रवास करत होती ज्यांचा अपघात झाला. या घटनेनंतर जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण अमरोहाहून दिल्ली जामिया विद्यापीठाकडे जात होते. 

मुलांचं वय अंदाजे 10 ते 13 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, चालक आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना गाझियाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस अपघाताचा तपास करण्यात व्यस्त आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, स्कूल व्हॅनचं मोठं नुकसान झालं. 

शनिवारी सकाळी 6.30 ते 7.00 च्या दरम्यान शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एर्टिगा कार दिल्लीतील जामियाला जात असताना ही घटना घडली. सर्व मुलं अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त गाडीतून मुलांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. 

गंभीररित्या जखमी झालेल्या मुलांना जवळच्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर मुलांना सर्वोदय आणि सीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमी मुलाला एमजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या संपूर्ण अपघाताचा तपास करण्यात व्यस्त आहेत. एसीपीच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्हीच्या आधारे हा अपघात कोणत्या वेळी आणि कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती घेत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातSchoolशाळाStudentविद्यार्थी