शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Delhi MCD Election Result Today: एका मतासाठी भाजपचा गेम, तर आपचा डबलगेम; दिल्ली महापौरांनी एक मत बाद ठरवले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 17:30 IST

सभागृहात मोठ्या प्रमाणावर नारेबाजी सुरु झाली आहे. मतमोजणी सुरु झाली आहे, परंतू महापौर शैली ओबेऱॉय यांनी एक मत बाद केल्याने भाजपाचे सदस्य गोंधळ करत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला दिल्ली महापालिकेतील गोंधळ काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. स्थायी समित्यांच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी एका मताच्या राजकारणाचा खेळ रंगला आहे. मतदानापूर्वी भाजपानेआपचा नगरसेवक फोडला तर आपच्या महापौरांनी मतदानावेळी भाजपाचे एक मतच बाद ठरविले आहे. महत्वाचे म्हणजे महापालिकेच्या सेक्रेटरी ऑफिसने हे मत अवैध ठरविण्यास नकार दिला आहे. 

यामुळे सभागृहात मोठ्या प्रमाणावर नारेबाजी सुरु झाली आहे. मतमोजणी सुरु झाली आहे, परंतू महापौर शैली ओबेऱॉय यांनी एक मत बाद केल्याने भाजपाचे सदस्य गोंधळ करत आहेत. म्युनिसिपल सेक्रेटरी महापौरांच्या या घोषणेवर समहत नाहीत. भाजपा सांगतेय की महापौरांना मत बाद असल्याचे ठरविण्याचा कोणताही अधिकार नाहीय. एमसीडीच्या स्टँडिंग कमिटीच्या सदस्यांसाठीच्या मतदानाची आणि मतमोजणीची प्रक्रिया संपली आहे. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. यादरम्यान भाजपाच्या पाच जणांनी आपला मतदान केल्याचा दावा आपने केला आहे. यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

भाजपाला तीन उमेदवार जिंकवण्यासाठी प्रत्येकी ३५ असे १०५ मते लागणार आहेत. तर आपला चार उमेदवार जिंकवण्यासाठी १४० मते हवी आहेत. परंतू आपकडे १३४ मतेच होती. अशातच एकतर भाजपाचे सदस्य फोडणे किंवा काँग्रेसचे सदस्य आपल्या बाजुने घेणे हे दोन पर्याय आपकडे होते. परंतू, महापौर निवडीवेळी काँग्रेसच्या सात सदस्यांनी सभागृहाचा त्याग केला होता. यामुळे भाजपाला एका मतासाठी एकच नगरसेवक फोडणे सोपे गेले होते.  भाजपाने आपचे नगरसेवक पवन सहरावत यांनाच फोडले आणि भाजपमध्ये सहभागी केले. 

सहरावत जेव्हा मतदानासाठी उठले तेव्हा आपच्या नगरसेवकांना त्यांना गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या. तर भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजुने घोषणाबाजी केली. 

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपBJPभाजपा