शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:16 IST

Delhi Manish Sisodia and Satyendra Jain News: मद्य घोटाळ्यामुळे आपला आपले सरकार गमवावे लागले, आता त्यांच्यावर आणखी एक मोठा आरोप झाला आहे.

Delhi Manish Sisodia and Satyendra Jain News: मद्य घोटाळ्याच्या दलदलीत आम आदमी पक्ष (आप) इतका रुतला की, त्यांना दिल्लीची सत्ता गमवावी लागली. या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे खास मित्र मनीष सिसोदिया (दिल्लीचे शिक्षणमंत्री) यांच्यासह पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना तिहाडवारी करावी लागली. हे सर्व नेते सध्या जामिनावर बाहेर आहेत. पण, आता दिल्लीतून एक मोठी बातमी सोर आली आहे. सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध 2 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आप सरकारच्या काळात शाळांमधील वर्गखोल्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने (एसीबी) कठोर कारवाई केली आहे. एसीबीने तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण 12,748 वर्गखोल्या आणि इमारतींच्या बांधकामात 2000 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित आहे.

एसीबीच्या चौकशीत समोर आलेले धक्कादायक खुलासे-

वर्गखोल्या सेमी पर्मनंट स्ट्रक्चर (SPS) म्हणून बांधल्या गेल्या होत्या, ज्यांचे आयुष्य 30 वर्षे असते. परंतु या वर्गखोल्यांची किंमत आरसीसी (पक्के) वर्गखोल्यांइतकीच होती.हे कंत्राट 34 कंत्राटदारांना देण्यात आले, त्यापैकी बहुतेकांचे आपशी संबंध असल्याचे सांगितले जाते.काम वेळेवर पूर्ण झाले नाही, त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली.कोणत्याही निश्चित प्रक्रियेचे पालन न करता सल्लागार आणि आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात आली, ज्यामुळे खर्च वाढला.केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) अहवालात अनेक अनियमितता उघड झाल्या, परंतु तीन वर्षे त्या दडपून ठेवण्यात आल्या.

कोणी केली तक्रारभाजप नेते हरीश खुराणा, कपिल मिश्रा, नीलकंठ बक्षी इत्यादींनी शाळेच्या वर्गखोल्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. एसीबीने म्हटले आहे की, दिलेल्या निविदेनुसार, शाळेच्या खोलीच्या बांधकामाचा एकवेळचा खर्च प्रति खोली सुमारे 24.86 लाख रुपये ठरवण्यात आला. परंतु, दिल्लीमध्ये अशा खोल्या साधारणतः प्रति खोली सुमारे 5 लाख रुपयांना बांधता येतात. शिवाय, असाही आरोप आहे की, हा प्रकल्प ज्या 34 कंत्राटदारांना देण्यात आला होता, त्यापैकी अनेकांचे आम आदमी पक्षाशी संबंध आहेत.

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदिया