आयुष्याला कंटाळून 'तो' आत्महत्या करायला निघाला; पुलावरून उडी मारताना दूरवरून दिसला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 21:54 IST2021-09-13T21:53:24+5:302021-09-13T21:54:45+5:30
काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांना त्यांच्या टेरेसवरून एक तरुण दिसला; आयुष्य संपवण्यासाठी तो पुलावरून उडी मारणार होता.

आयुष्याला कंटाळून 'तो' आत्महत्या करायला निघाला; पुलावरून उडी मारताना दूरवरून दिसला अन् मग...
दिल्ली: दिल्लीतल्या अँड्र्यूज उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी वाचवलं आहे. आयुष्याला कंटाळून जीव देत असल्याचं हा तरुण म्हणत होता. याबद्दलची सूचना योग्य वेळी पोलिसांना मिळाली. त्यामुळे तरुणाला वाचवण्यात यश आलं. पोलिसांनी वेगानं हालचाली केल्यानं तरुणाचा जीव वाचला.
तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसांनी उड्डाणपुलाच्या खाली त्वरित जाळी धरली. यादरम्यान तरुणाचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरू होता. तरुणाशी संवाद साधत पोलिसांनी त्याला गुंतवून ठेवलं. त्यानंतर तरुणाला उड्डाणपुलावरूनच मागे खेचण्यात आलं. हा तरुण मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे.
आज शाम छत्त पर टहलते समय अचानक इस शख्स पर नजर पड़ी,बिना समय गवाये स्थानीय SHO को कॉल किया और वह 5मिनट के भीतर मेरे द्वारा बताई गई जगह पर पुलिस ने पहुँच कर शख्स को जो कि शराब के नशे में था,बेरोजगार, परेशान था,आत्महत्या करना चाहता था,की जिंदगी को बचा लिया।@DelhiPolice 🇮🇳🙏#Delhipic.twitter.com/dIaBuFSrmy
— Alka Lamba (@LambaAlka) September 12, 2021
काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. 'संध्याकाळी टेरेसवर फिरत असताना अचानक या तरुणाकडे लक्ष गेलं. याची माहिती तत्काळ एसएचओंना दिली. त्यानंतर ५ मिनिटांत पोलीस घटनास्थळी आले. तरुण दारूच्या नशेत होता. बेरोजगार असल्यानं त्रासलेला तरुण आत्महत्या करणार होता. एक जीव वाचवला गेला,' असं लांबा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.