दिल्ली मद्य घोटाळा; गोव्यातील AAP च्या प्रदेशाध्यक्षांसह चार नेत्यांना ED चे समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:13 PM2024-03-27T22:13:39+5:302024-03-27T22:14:51+5:30

आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्यासह चौघांना ED ने चौकशीसाठी बोलावले आहे.

Delhi Liquor Scam; ED summons four leaders including state president of AAP in Goa | दिल्ली मद्य घोटाळा; गोव्यातील AAP च्या प्रदेशाध्यक्षांसह चार नेत्यांना ED चे समन्स

दिल्ली मद्य घोटाळा; गोव्यातील AAP च्या प्रदेशाध्यक्षांसह चार नेत्यांना ED चे समन्स

Delhi Liquor policy case : दिल्ली मद्य घोटाळ्यातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर, आता ED ने आपली कारवाई सुरुच ठेवली आहे. याच प्रकरणात आता आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर आणि पक्षाच्या इतर दोन नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांच्या सोबतच भंडारी समाजातील अशोक नाईक यांनाही एजन्सीने समन्स पाठवले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने 28 मार्च रोजी या सर्वांना चौकशीसाठी दिल्ली कार्यालयात बोलावले आहे. ईडीचा आरोप आहे की, दिल्ली मद्य धोरणाच्या नावाखाली गोळा केलेला पैसा आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला होता. मात्र, आपचेगोवा प्रमुख अमित पालेकर यांनी एजन्सीचे हे आरोप फेटाळून लावत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली असल्याचे म्हटले आहे.

'कुठल्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार'
एजन्सीने आपल्या आरोपपत्रात दावा केला की, AAP ने साउथ लॉबीकडून मिळालेल्या 100 कोटी रुपयांपैकी गोवा निवडणूक प्रचारात सुमारे 45 कोटी रुपये वापरले होते. दरम्यान, अमित पालेकर यांनी गोव्यात बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याच्या आरोपांचे खंडन केले. तसेच, पक्ष कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. दरम्यान, ईडीने अमित पालेकर यांच्यासह रामराव वाघ आणि दत्तप्रसाद नाईक यांनाही समन्स बजावले आहे.

संबंधित बातमी- CM अरविंद केजरीवालांना उच्च न्यायालयाचा झटका, अटकेपासून दिलासा देण्यास नकार...

Web Title: Delhi Liquor Scam; ED summons four leaders including state president of AAP in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.