शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क धोरणप्रकरणी ईडीची कारवाई; दिल्लीसह देशभरात 30 ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:41 IST

Delhi Liquor Policy Case : ईडीने मंगळवारी राजधानी दिल्लीसह देशातील 30 ठिकाणी छापे टाकले.

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील (Delhi Liquor Policy Case) कथित भ्रष्टाचार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली-एनसीआरसह देशभरात छापेमारी सुरू केली आहे. ईडीने मंगळवारी राजधानी दिल्लीसह देशातील 30 ठिकाणी छापे टाकले. आरोपी समीर महेंद्रूच्या दिल्लीतील घरावर छापेमारी सुरू आहे. तसेच गुरुग्राम, लखनौ, हैदराबाद, मुंबई आणि बंगळुरू येथेही छापे टाकले जात आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, यूपी, पंजाब, हरियाणा आणि तेलंगणामध्ये ईडीचे छापे टाकले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक दिल्लीतील जोरबागमध्येही पोहोचले आहे. समीर महेंद्रूच्या मालमत्तांवर ईडीनं छापा टाकला आहे. समीर हे मेसर्स इंडो स्प्रिट्सचे एमडी आहेत. त्यांनी मेसर्स राधा इंडस्ट्रीजच्या राजेंद्र प्लेस येथील युको बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. दरम्यान, सीबीआयच्या एफआयआरमध्ये ज्यांचे नाव नोंदवले आहे, त्यांच्या घरावर छापे टाकले जात आहेत.

ईडीचे कोणतेही पथक दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी किंवा कार्यालयात गेलेले नाही. सिसोदिया हे सीबीआय तपास करत असलेल्या अबकारी धोरण प्रकरणात आरोपी आहेत. दरम्यान, ईडीच्या तपासाला उत्तर देताना मनीष सिसोदिया म्हणाले, "पहिल्यांदा सीबीआयने छापा टाकला, त्यांना काहीही सापडले नाही. आता ईडी छापे टाकत आहे, त्यांनाही काही मिळणार नाही. अरविंद केजरीवाल यांच्याकडून सुरू असलेले चांगले काम रोखण्याचा हा प्रयत्न आहे. सीबीआय, ईडी यांना हवे ते करू द्या. मला काही माहिती नाही, त्यांना फक्त शाळांचे आणखी ब्लूप्रिंट मिळतील."

दुसरीकडे, भाजप नेते मनोज तिवारी यांनी मनीष सिसोदिया यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "मद्य धोरणाबाबत समोर आलेल्या स्टिंग ऑपरेशनने आम आदमी पार्टी, मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांना दहशतीच्या शिखरावर आणले आहे. स्टिंग ऑपरेशननंतर सीबीआयच्या प्रतिक्रियेवरून मनीष सिसोदिया यांनी स्वत:लाच गोवले असल्याचे दिसते. मनीष सिसोदिया यांना कोणतीही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असे सीबीआयने स्पष्टपणे म्हटले आहे."

सीबीआयने 19 ठिकाणी टाकले होते छापे गेल्या महिन्यात सीबीआयने मनीष सिसोदिया, आयएएस अधिकारी आणि दिल्लीचे माजी उत्पादन शुल्क आयुक्त अर्वा गोपी कृष्णा यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर आणि सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अन्य 19 ठिकाणी छापे टाकले होते. उत्पादन शुल्क विभाग सांभाळणारे मनीष सिसोदिया, माजी उत्पादन शुल्क आयुक्त अर्वा गोपी कृष्णा, माजी उपायुक्त आनंद कुमार तिवारी, सहाय्यक उत्पादन शुल्क आयुक्त पंकज भटनागर, नऊ व्यापारी आणि दोन कंपन्यांची केंद्रीय तपास संस्थेच्या एफआयआरमध्ये नावे आहेत.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीManish Sisodiaमनीष सिसोदियाCBIगुन्हा अन्वेषण विभाग