शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah : "अशी कठोर कारवाई करा की, पुन्हा हिंसा घडता कामा नये"; अमित शाह यांचे कडक निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 22:56 IST

Delhi Jahangirpuri Violence And Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठं विधान केलं आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची (Delhi Jahangirpuri Violence) सध्या सर्वत्र चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून, त्यावरून राजकारणही सुरू झालं आहे. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठं विधान केलं आहे. अमित शाह यांनी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडू नये.

दिल्लीत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना देखील अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचारानंतर लगेचच अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून देशभरात राजकरण तापलं आहे. या घटनेबाबत केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर विरोधी पक्ष सवाल करत आहेत. 

भाजपकडून याला उत्तर दिले जात आहे. दिल्लीतील पोलीस, कायदा आणि सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते, त्यामुळेच केंद्र विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मात्र याला उत्तर देण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वतीने एक पत्र जारी करण्यात आले असून त्यात काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींचा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर भाजपच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थानमधील करौली येथील हिंसाचारावर भाजपा नेते गौरव भाटिया यांनी काँग्रेसकडे उत्तर मागितले आहे. 

हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलीस आता अटक करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमातून लोकांची ओळख पटवली जात असून, या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना तातडीने अटक केली जात आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आधीच अटक केली होती, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींकडून हिंसाचाराबद्दल चौकशी केली जात आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी या घटनेबाबत सांगितले की, दुपारी 4.15 वाजता हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यानंतर काही लोकांमध्ये वाद झाल्यावर दगडफेक सुरू झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस