शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Subramanian Swamy: सुब्रमण्यम स्वामींना मोठा धक्का; एअर इंडिया विक्री आव्हान याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 07:45 IST

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्या. ज्योतीसिंग यांनी हा निर्णय दिला. ‘आम्ही तुमची याचिका फेटाळून लावत आहोत,’ असे न्यायालयाने म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेला आव्हान देणारी भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एअर इंडियाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरण्यात आलेली पद्धती एकतर्फी, बेकायदेशीर आणि लोकहिताच्या विरुद्ध आहे, असा आरोप करून स्वामी यांनी ही याचिका दाखल केली होती.

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्या. ज्योतीसिंग यांनी हा निर्णय दिला. ‘आम्ही तुमची याचिका फेटाळून लावत आहोत,’ असे न्यायालयाने म्हटले. याबाबतचे विस्तृत निकालपत्र नंतर अपलोड  केले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने ४ जानेवारी रोजी स्वामी यांच्यासह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या याचिकेस केंद्र सरकारने विरोध केला होता. २५ ऑक्टोबर रोजी टाटा सन्ससोबत एअर इंडियासाठी १८ हजार कोटी रुपयांचा खरेदी करार करण्यात आला होता. 

सीबीआय चौकशीची याचिकेत मागणीn एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या मंजुरीचा निर्णय रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती स्वामी यांनी आपल्या याचिकेत केली होती. n या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली होती.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीAir India Disinvestmentएअर इंडिया निर्गुंतवणूक