शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा 'छपाक' चित्रपटगृहात दिसणार नाही, निर्मात्यांना हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 12:39 IST

छपाकच्या निर्मात्यांना दिल्ली हायकोर्टाने आदेश दिले आहेत. पीडितेच्या वकील अपर्णा भट यांना कथेचे श्रेय द्या असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

ठळक मुद्देछपाकच्या निर्मात्यांना दिल्ली हायकोर्टाने आदेश दिले आहेत.पीडितेच्या वकील अपर्णा भट यांना कथेचे श्रेय द्या असे हायकोर्टाने म्हटले आहे.कथेचे श्रेय न दिल्यास 15 जानेवारीनंतर छपाक हा चित्रपटगृहात दाखवला जाणार नाही असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे.

नवी दिल्ली - दीपिका पदुकोण स्‍टारर 'छपाक' रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी छपाकचे प्रदर्शन थांबवण्यासाठी दिल्ली पटियाल हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. लक्ष्मीच्या वकील अपर्णा भट्ट यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता छपाकच्या निर्मात्यांना दिल्ली हायकोर्टाने आदेश दिले आहेत. पीडितेच्या वकील अपर्णा भट यांना कथेचे श्रेय द्या असे हायकोर्टाने म्हटले आहे.

अपर्णा भट यांना कथेचे श्रेय न दिल्यास 15 जानेवारीनंतर छपाक हा चित्रपटगृहात दाखवला जाणार नाही असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. अपर्णा भट या चित्रपटाच्या निर्मात्यांवर नाराज आहेत. निर्मात्यांनी चित्रपटात त्यांच्या नावाचा कुठेच उल्लेख केलेला नाही तसेच कुठेच क्रेडिटदेखील देखील दिलेले नाही. या कारणामुळे त्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेवर शनिवारी (11 जानेवारी) कोर्टात सुनावणी झाली. कोर्टात अपर्णा यांनी छपाकची दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि निर्माती दीपिका पदुकोण विरोधात याचिका दाखल केली होती. अपर्णा यांनी जवळपास 10 वर्षे लक्ष्मीची केस कोर्टात लढली होती आणि जिंकलीसुद्धा. यासाठी त्यांनी कोणतेचे मानधन घेतले नव्हते.

'अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची केस अनेक वर्षे लढली मात्र या चित्रपटात मला कुठेच क्रेडिट दिले गेले नाही' असे याचिकेत अपर्णा यांनी म्हटले होते.  तसेच अपर्णा यांचे म्हणणेआहे की, त्यांनी छपाक चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी सुद्धा मदत केली होती. छपाकच्या निर्मात्यांनी चित्रपटात क्रेडिट देण्याचा विश्वास दिला होता. मात्र असे प्रत्यक्षात झाले नसल्याचे अपर्णा यांचे म्हणणे होते. जोपर्यंत क्रेडिट लिस्टमध्ये त्यांचं नाव सामिल होत नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका अशी मागणी अपर्णा यांनी केली होती. जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता. यावरून तिचा चित्रपट छपाकवर बहिष्कार घालण्याची मोहीम ट्रोलर्सनी राबविली आहे. तर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे

 

महत्त्वाच्या बातम्या 

विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी

युक्रेनचे विमान चुकून पाडले, इराणी सैन्याने दिली कबुली

Today's Fuel Price : दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

गाई-म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले, उद्यापासून अंमलबजावणी 

ट्रक-बसची भीषण टक्कर होऊन लागली आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू, 21 जण जखमी

 

टॅग्स :Chhapaak Movieछपाकdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयDeepika Padukoneदीपिका पादुकोण