न्यायमूर्तींच्या बंगल्याला आग लागली आणि बिंग फुटले; अग्निशमन दलाला घबाड सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 09:28 IST2025-03-21T09:27:42+5:302025-03-21T09:28:01+5:30

महाशयांच्या सरकारी निवासस्थानाला आग लागली होती, ही आग विझवायला गेलेल्या अग्निशमन दलाला त्या घरात मोठ्या प्रमाणावर पैशांचा साठा सापडला होता. 

Delhi HC Judge's yashvant varma bungalow catches fire and firefighters found lots of cash; SC descide transfer him | न्यायमूर्तींच्या बंगल्याला आग लागली आणि बिंग फुटले; अग्निशमन दलाला घबाड सापडले

न्यायमूर्तींच्या बंगल्याला आग लागली आणि बिंग फुटले; अग्निशमन दलाला घबाड सापडले

दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींच्या घरात मोठ्या प्रमाणावर रोख पैसे मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने या प्रतापी न्यायमूर्तींना त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजेच अलाहाबादच्या हायकोर्टात बदली करण्याची शिफारस केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महाशयांच्या सरकारी निवासस्थानाला आग लागली होती, ही आग विझवायला गेलेल्या अग्निशमन दलाला त्या घरात मोठ्या प्रमाणावर पैशांचा साठा सापडला होता. 

यशवंत वर्मा असे या न्यायमूर्तींचे नाव असून काही न्यायमूर्तींनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. जर वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तर सर्वोच्च न्यायालयाने १९९९ च्या प्रक्रियेनुसार तपास सुरु करावा, अशी मागणीही केली आहे. हायकोर्टाच्या जजच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्याने न्यायपालिकेत खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वात वर्मा यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जेव्हा आग लागली तेव्हा वर्मा हे दिल्लीत नव्हते. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला बोलविले होते. आग विझवत असताना एका खोलीत अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कॅश सापडली. पोलिसांनी याची माहिती ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना दिली. तिथून सर्वोच्च न्यायालयाला याची सूचना देण्यात आली. वर्मा हे २०२१ मध्ये अलाहाबादहून दिल्लीत आले होते. 

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदलीची शिफारस करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तातडीची बैठक घेतली आणि त्यामध्ये बदलीची शिफारस करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांविरुद्धचा अहवाल आल्यानंतर गुरुवारी कॉलेजियमची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. अंतर्गत चौकशीचाही विचार केला जात आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काही जज न्यायपालिकेची छवी चांगली ठेवण्यासाठी त्यांच्यावर महाभियोग दाखल करण्याची मागणी करत आहेत. नुसती बदली केली तर न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास उडेल असेही म्हणत आहेत. 

Web Title: Delhi HC Judge's yashvant varma bungalow catches fire and firefighters found lots of cash; SC descide transfer him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.